शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडय़ात मनसेच्या मुलाखती

By admin | Updated: September 16, 2014 02:15 IST

मराठवाडय़ातून मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या 168 जणांनी सोमवारी औरंगाबादेत मुलाखती दिल्या.

औरंगाबाद : मराठवाडय़ातून मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या 168 जणांनी सोमवारी औरंगाबादेत मुलाखती दिल्या. यामध्ये चार माजी आमदारांचा समावेश आहे. औरंगाबाद वगळता उर्वरित सातही जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्या.
मुलाखती घेण्यासाठी राज पक्षाच्या इतर नेत्यांसह रविवारीच शहरात दाखल झाले होते. सकाळी 11 वाजता मुलाखतींना सुरुवात झाली. सर्वात आधी उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर एकापाठोपाठ लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. एकेका मतदारसंघातील इच्छुकांना एकाचवेळी समोर बसवून त्यांना प्रश्न विचारण्यात येत होते. उमेदवारी का द्यावी किंवा पक्षासाठी तुमचे योगदान काय, हे विचारले जात होते. औरंगाबाद जिलतील इच्छुकांना आत बोलावल्यानंतर मात्र राज ठाकरे प्रकृती बरी नसल्याचे सांगून तेथून बाहेर पडले. त्यामुळे औरंगाबाद तसेच खान्देशातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती गटनेते बाळा नांदगावकर, आ. प्रवीण दरेकर, मंगेश सांगळे आदींनी घेतल्या. मुलाखतींसाठी सर्वच इच्छुक फाईल हातात घेऊन आले होते. 
मुलाखत देणा:यांमध्ये हरिभाऊ लहाने, सुनील धांडे, रोहिदास चव्हाण आणि किसनराव काळे या माजी आमदारांचाही समावेश होता. याशिवाय जालना जिल्ह्यातील बाबासाहेब आकात,  जे. के. जाधव यांनीही मुलाखती दिल्या. 
 
चार विभागप्रमुखांसह 68 जण ‘मनसे’तून बाहेर
पिंपरी  (जि. पुणो) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शहरातील अनधिकृत बांधकामाविषयीची भूमिका आणि पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत पक्षाच्या स्थानिक पदाधिका:यांनी राजीनामा दिले आहेत. याबाबतची माहिती सदस्य अॅड. सुनील वाल्हेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दोन दिवसांत राजकीय भूमिका जाहीर केली जाणार असल्याचे वाल्हेकर म्हणाल़ेवाल्हेकर यांच्यासह 4 विभागप्रमुख, 4 उपविभागप्रमुख यांच्यासह शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्ष आणि सदस्य, तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी अशा एकूण 68 जणांनी सोमवारी पक्षाकडे राजीनामा पाठविला आहे. ठाकरे यांची शहरातील अनधिकृत बांधकामाविषयीची भूमिका, स्थानिक नेत्यांकडून मिळणारी वागणूक आणि कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.