शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

राऊतांच्या टीकेवर मनसेचाही खोचक टोला; 'नॉटी राऊत' म्हणत पूर्वीची विधानं ऐकवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 11:04 IST

राज-अमित शाह भेटीवरून संजय राऊतांनी टीका केली होती. राज ठाकरेंनी काढलेले जुनं व्यंगचित्र राऊतांनी पोस्ट करत मनसेला टोला लगावला होता. त्याला आता मनसेनेही तसेच उत्तर दिले आहे.

मुंबई - MNS on Sanjay Raut ( Marathi Newsमनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले, त्यानंतर मनसे-भाजपा युती होईल अशी चर्चा सुरू झाली. त्यात विरोधकांनी मनसेवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. त्यात प्रामुख्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी काढलेले जुने व्यंगचित्र ट्विट करून मनसेला टोला लगावला. मोदी-शाहांवर टीका करताना राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र २०१९ मध्ये काढलं होतं. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही संजय राऊतांना जुन्या विधानांचा दाखला देत खोचक प्रतिटोला लगावला.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत अप्रतिम! अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेला व्हिडिओ, मुख्य कलाकार अर्थातच "नॉटी राऊत " म्हणत एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात संजय राऊतांच्या मुलाखतींमधील विविध विधाने आहेत ज्यात राऊत मोदी-शाहांचे आणि भाजपाचे तोंडभरून कौतुक करताना दिसतात. या व्हिडिओत संजय राऊत बोलतायेत की, भाजपाला आम्ही नेहमीच देशाच्या राजकारणात मोठ्या भावाचा दर्जा दिलाय. मोदींच्या उंचीचा देशात कुणी नेता नाही. येणाऱ्या २५ वर्षात बनण्याची शक्यताही नाही. चौकीदार खूप विश्वसनीय आहे. आम्ही त्यांच्यावर भरवसा ठेवू शकतो असं राऊतांनी म्हटलं होते. 

तसेच मोदी-शाह हेच आमच्यासाठी सुप्रीम कोर्ट आहेत. मोदींच्या तुलनेत राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव अथवा महाराष्ट्रात शरद पवार असो कुणालाही जनतेने स्वीकार केले नाही. पंतप्रधान मोदींसमोर कुठल्याही नेत्याला जनता स्वीकारणार नाही. भाजपा देशाच्या राजकारणात आमच्या मोठ्या भावाची भूमिका नेहमी निभावणार आणि आम्ही ते स्वीकारही करतो. मोदींचे नेतृत्व विश्वासपात्र आहे असंही राऊतांनी सांगितले होते. 

त्यासोबतच राऊतांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेचाही उल्लेख या व्हिडिओत आहे. राहुल गांधी म्हणत होते, नरेंद्र मोदींची जमेची बाजू म्हणजे ती त्यांची प्रतिमा, मी ते भंग करेन. मात्र हे लोकांना आवडलेले नाही. कुणीही कुणाची प्रतिमा भंग करू शकत नाही. नरेंद्र मोदींची प्रतिमा जनतेत खूप चांगली आहे. मोदींचा प्रतिमा भंग करण्यात राहुल गांधी अयशस्वी ठरले असंही संजय राऊतांनी मागे म्हटल्याची आठवण मनसे नेते संदीप देशपांडेंनी करून दिली.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी