शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वर्धापन दिनी मनसेला मोठं यश, ‘या’ तालुक्याचं पटकावलं सभापतीपद, भाजपासोबत स्थापन केली सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 20:35 IST

Renapur Panchayat Samiti: आज मनसेचा २० वा वर्धापन दिन साजरा होत असून, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही रायगड येथे जाऊन पक्षाचा वर्धापन दिन  साजरा केला. दरम्यान, पक्षाच्या वर्धापन दिनी मनसेला मराठवाड्यात मोठं यश मिळालं आहे.

आज मनसेचा २० वा वर्धापन दिन साजरा होत असून, मनसेप्रमुखराज ठाकरे यांनीही रायगड येथे जाऊन पक्षाचा वर्धापन दिन  साजरा केला. दरम्यान, पक्षाच्या वर्धापन दिनी मनसेला मोठं यश मिळालं आहे. मनसेनं मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामधील रेणापूर पंचायत समितीचं सभापतीपद पटकावलं आहे. रेणापूरमध्ये मनसे आणि भाजपा युतीची सत्ता आली असून, भाजपाच्या पाठिंब्याने येथे मनसेच्या मोनिका सूर्यवंशी सभापतीपदी विराजमान झाल्या आहेत. तर भाजपाचे शरद दरेकर यांनी उपसभापतीपद पटकावले आहे. 

गेल्या महिन्यात झालेल्या समितीच्या निवडणुकीत रेणापूर पंचायत समितीमधील आठ जागांपैकी तीन जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. तर काँग्रेसलाही तीन जागा मिळाल्या होत्या. तर मनसेला २ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे येथे मनसे किंगमेकरच्या भूमिकेत होती. तसेच मनसेचे दोन सदस्य ज्या पक्षाला पाठिंबा देणार, त्याची सत्ता येणार अशी परिस्थिती होती. अखेरीस मनसे आणि भाजपाची युती होऊन पक्षाला सभापतीपदाची लॉटरी लागली.

रेणापूर पंचायत समितीचं सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होतं. अशा परिस्थितीत सभापतीपदाची संधी कुणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, आज झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपा आणि मनसे युतीच्या मोनिका सूर्यवंशी यांनी बाजी मारली. तर भाजपाचे शरद दरेकर हे उपसभापतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाले.  

English
हिंदी सारांश
Web Title : MNS Achieves Victory on Anniversary, Claims Chairperson Post with BJP!

Web Summary : On its anniversary, MNS secured the Renapur Panchayat Samiti chairperson post in Latur, Marathwada. MNS's Monika Suryavanshi was elected with BJP support, while Sharad Darekar (BJP) became Deputy Chairperson. The MNS-BJP alliance formed the ruling coalition after recent committee elections.
टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेlaturलातूर