शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:16 IST

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई - हिंदी सक्तीविरोधात एकत्र आलेले ठाकरे बंधू राजकीय पटलावर युती करणार का याबाबत अजूनही साशंकता आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून युतीबाबत सकारात्मकता दाखवण्यात आली असली तरी राज ठाकरे यांनी युतीवर कुणीही भाष्य करू नका असा आदेशच नेते, पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यातच मनसेचे आजपासून २ दिवसीय शिबिर नाशिकच्या इगतपुरी येथे पार पडणार आहे. या शिबिराला राज्यभरातून मनसेचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. त्याठिकाणी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या शिबिराबाबत मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, पक्षसंघटनेचे २ दिवसीय शिबिर आहे. या शिबिरात अनेक विषयांवर चर्चा केली जाईल. राजसाहेब नेते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधतील. पक्षातंर्गत विविध विषयांवर चर्चा होईल. मात्र शिबिरात काय मुद्दे असतील, कशावर चर्चा होईल हे आम्हाला माहिती नाही. तिथे गेल्यावर आम्हाला कळेल असं त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १६ जुलैपर्यंत हे शिबिर असणार आहे. त्यासाठी नेते, पदाधिकारी इगतपुरीत दाखल झाले आहेत. 

मनसेची मोर्चेबांधणी

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेत सरकारविरोधात एल्गार पुकारला होता. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक मराठी भाषा प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले. त्यात प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची हाक दिली. त्यामुळे मनसे-उद्धवसेना या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. हिंदी सक्तीला होणारा विरोध पाहून राज्य सरकारने याबाबत काढलेले दोन्ही जीआर मागे घेत असल्याचे घोषित केले. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्याचे आयोजन केले. १८ वर्षांनी पहिल्यांदाच राज आणि उद्धव एकाच व्यासपीठावर आले त्यामुळे येत्या काळात ठाकरे बंधू युती होणार अशी चर्चा सुरू झाली. 

"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…"

दरम्यान, युतीबाबत संजय राऊत यांनी सामना रोखठोकमध्ये भाष्य केले होते. त्यावर मी संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये काय लिहिले होते, हे अजून वाचलेलं नाही. युती होणार की नाही याबाबत मला माहिती नाही. त्याबद्दल राज ठाकरे हे बोलतील. पक्षाचे प्रमुख हे आमच्यापेक्षा एक हजार फूट अधिक पुढे असतात. पक्षाचं हित कशात आहे, हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. मनसेने आतापर्यंत निवडणुका ह्या  एकट्याने लढवलेल्या आहेत. त्यामुळे आताही वेळ आली तर आम्ही एकट्याने निवडणूक लढवू शकतो असं विधान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केल्याने ठाकरे बंधू युतीवर संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBala Nandgaonkarबाळा नांदगावकरhindiहिंदी