शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर; मुंडे भाऊ-बहिण भविष्यात एकत्र दिसणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 12:13 IST

एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्यांनी भाजपा वाढवला. परंतु ज्यारितीने तिकीट द्यायचं आणि त्यांनाच पाडायचं सूडाचं राजकारण भाजपानं केले असा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला.

मुंबई - राज्यात भाजपा सरकार आल्यापासून पुन्हा एकदा मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांची मंत्रिपदावर वर्णी लागावी अशी मागणी केली आहे. परंतु मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले. पंकजा मुंडे यांना सुरुवातीला विधान परिषद उमेदवारी आणि आता मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सातत्याने पुढे येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. 

अमोल मिटकरी म्हणाले की, एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्यांनी भाजपा वाढवला. परंतु ज्यारितीने तिकीट द्यायचं आणि त्यांनाच पाडायचं सूडाचं राजकारण भाजपानं केले. ते रोहिणी खडसेंच्या लक्षात आले. पंकजा मुंडे यांच्याही ते लक्षात आले पाहिजे. आपल्या पक्षाला वाढवण्याचं प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे पंख कसे छाटतात. तुमच्या पक्षात तुम्हाला भाजपा बाजूला कसं ठेवतंय हे तुम्ही ओळखणं गरजेचे आहे असं सांगत मिटकरींनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. 

तर गोपीनाथ मुंडे हे वेगळ्या पक्षात असले तरी त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात वेगळी ओळख आहे. आमचे अनेक वर्षांचे संबंध होते. जरी विरोधक असला तरी वैयक्तिक संबंध पाळले पाहिजे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. परंतु आता कटुता वाढताना दिसते हे दुर्देवी आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. जर मिटकरींनी चांगला विचार मांडला असेल तर पक्ष जरूर त्याचा विचार करेल. पंकजा मुंडे कुठल्याही पक्षात राहिल्या तरी त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या शुभेच्छा आणि प्रेम कायम असेल असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

पंकजा मुंडे नाराज हे कपोकल्पित - भाजपा      दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रियेवर भाजपानं हल्लाबोल केला. राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना कुणाला काहीही म्हणू द्या, भाजपात अंतर्गत वाद नाही. पंकजा मुडे नाराज आहेत. पंकजा या पक्षात जाणार तिथे जाणार असा कुठेही विषय नाही. हे सगळं कपोकल्पित आहे. पण मनातील खेळ सुरू आहे असं सांगत मंत्री गिरीश महाजनांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSupriya Suleसुप्रिया सुळे