Avishkar Rahangdale : ‘आज काळीज फाटलं…’ मुलाचा अपघाती निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांची भावूक पोस्ट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 23:45 IST2022-01-26T23:43:20+5:302022-01-26T23:45:19+5:30

Avishkar Rahangdale News: कारवरील नियंत्रण सुटून काल झालेल्या भीषण अपघातात भाजपा आमदार विजय रहांगडाले यांचा पुत्र आविष्कार याचे अकाली निधन झाले होते.

MLA Vijay Rahangdale's emotional post after the accidental death of his son | Avishkar Rahangdale : ‘आज काळीज फाटलं…’ मुलाचा अपघाती निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांची भावूक पोस्ट  

Avishkar Rahangdale : ‘आज काळीज फाटलं…’ मुलाचा अपघाती निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांची भावूक पोस्ट  

गोंदिया - कारवरील नियंत्रण सुटून काल झालेल्या भीषण अपघातात भाजपा आमदार विजय रहांगडाले यांचा पुत्र आविष्कार याचे अकाली निधन झाले होते. मुलाच्या अकाली जाण्यामुळे आमदार विजय रहांगडाले यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, आज त्यांनी एक भावूक पोस्ट लिहून मुलाला श्रद्धांजली वाहिली आहे.

आमदार विजय रहांगडाले यांनी फेसबूकवर एक कविता शेअर करत आविष्कार याला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यात ते म्हणाले की, 
आज काळीज फाटलं,
त्यानं आकाश गाठलं;
अविष्कार आमचा हिरा,
होता आनंदाचा झरा; अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

काल कारवरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाला होता. यामध्ये मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. देवळी येथून वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ कारला अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली होती.  यामध्ये गोंदियातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले याचाही मृत्यू झाला होता. अविष्कार वर्धा येथे दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. रात्री वर्ध्याला परत येत असताना त्यांची कार नदीत कोसळली. या अपघातात त्याच्यासह सातही मित्रांच्या दुर्दैवी मृत्यू झाला
 

Web Title: MLA Vijay Rahangdale's emotional post after the accidental death of his son