'संतोष देशमुखचा ज्यांनी मुडदा पाडला त्यांचा आका तपासा'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:47 IST2024-12-17T12:44:02+5:302024-12-17T12:47:13+5:30
बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटत आहेत.

'संतोष देशमुखचा ज्यांनी मुडदा पाडला त्यांचा आका तपासा'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण आता हिवाळी अधिवेशनातही चर्चेला आले आहे. काल ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी या प्रकरणी सभागृहात कारवाई करण्याची मागणी केली होती. तर आज भाजपाचे आमदार सुरेश धस यांनीही या हत्येमागील मास्टरमाइंड कोण आहे याचा तपास करण्याची मागणी केली आहे. आमदार सुरेश धस यांनी आज नागपुरात सभागृहाबाहेर पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेला दावाही खोडून काढला.
नवा अल्टिमेटम! तारीख ठरली, अंतरवालीत या...; मनोज जरांगेंची पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
काल मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात झालेली हत्या ही आर्थिक व्यवहारातून झाली, त्यामागे जातीय कारण नव्हते, असं म्हटले होते. आता मुंडे यांचा हा दावा आमदार सुरेश धस यांनी खोडून काढला आहे. ही हत्या आर्थिक देवाणघेवाणीतून झाली नव्हती. हे मी सांगतो. मा पण जिल्ह्यातच राहतो. संतोष देशमुख गरीब आहे. एका दलित व्यक्तिला वाचवायला गेले म्हणून त्यांना मारण्यात आले आहे, असंही सुरेश धस म्हणाले.
आमदार सुरेश धस म्हणाले, युवक सरपंच यांच्या हत्येतील चार आरोपी फरार आहेत. पोलिसांनी आम्हाला असं सांगितलं आहे की, ते आरोपी मोबाईल आणि गाडी बार्शी जवळ सोडून पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांच लोकेशन ट्रेस होत नाही. पण माझ मत असं आहे की, सरपंच यांना मारहाण करत असतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन दुसऱ्या कोणाला तरी दाखवण्यात आला आहे. त्यांचे सापडलेले मोबाइल ओपन केले पाहिजेत. आरोपींना ज्याला ते व्हिडीओ कॉल करुन दाखवले आहे. त्याला सुद्धा आरोपी केले पाहिजे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
'मी एसआयटी नियुक्तीसंदर्भात पत्र दिले'
"आरोपींनी देशमुख यांना पाणी सुद्धा दिलेले नाही. दोन तास त्यांना मारहाण करण्यात येत होती. मी एसआयटी नियुक्तीसंदर्भात पत्र दिले आहे. आधी सीआयडी चौकशीची नियुक्ती झाली आहे. सीआयडीला नावं ठेवत नाही, मात्र घटनेचा तपास लोकल पोलिसांकडे ठेवावा यासाठी मागणी केली. आज किंवा उद्या एसआयटी गठीत होईल, त्यानंतर ॲक्शन होईल. विमा कंपन्या ज्या पद्धतीने डाटाचा वापर करतात तशा प्रकारचा यांचा डाटा तपासला पाहिजे. गेल्या एका वर्षामध्ये या आरोपींचे कोणासोबत कॉल झाले आहेत? त्यांच्या खात्यावरुन काही व्यवहार झाले आहेत. का? हे पाहिले पाहिजे. संतोष देशमुख अतिशय गरीब आहेत. दलित व्यक्तिला मारहाण का केली हे विचारायला गेल्याच्या रागातून त्यांना मारहाण करण्यात आली आहे, असंही धस म्हणाले.