आमदार सीमा हिरेंच्या गाडीला कसाऱ्यात अपघात; अंगरक्षकाकडून समोरील वाहनचालकास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 12:18 IST2018-02-23T12:18:01+5:302018-02-23T12:18:11+5:30

अंगरक्षकाने समोरच्या वाहनचालकाशी हुज्जत घालतेवेळी स्वत:कडील सर्व्हिस रिव्हॉल्वरही बाहेर काढले.

MLA Seema hire met with an accident in Kasara | आमदार सीमा हिरेंच्या गाडीला कसाऱ्यात अपघात; अंगरक्षकाकडून समोरील वाहनचालकास मारहाण

आमदार सीमा हिरेंच्या गाडीला कसाऱ्यात अपघात; अंगरक्षकाकडून समोरील वाहनचालकास मारहाण

नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांच्या गाडीला शुक्रवारी सकाळी कसाऱ्यात अपघात झाला. या अपघातात सीमा हिरे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वाहनचालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा दावा सीमा हिरे यांनी केल्या. 
दरम्यान, या अपघातानंतर सीमा हिरे यांच्या अंगरक्षकाने समोरील वाहनचालकास मारहाण केली. त्यामुळे हा वाद चिघळला आहे. हिरे यांच्या अंगरक्षकाने समोरच्या वाहनचालकाशी हुज्जत घालतेवेळी स्वत:कडील सर्व्हिस रिव्हॉल्वरही बाहेर काढल्याचा आरोप होत आहे. मारहाण झालेला चालक स्थानिक रहिवाशी असल्याने ग्रामस्थांनी हिरे यांच्या गाडीला घेराव घातला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. अखेर या सर्वांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. 

दरम्यान, या घटनेनंतर सीमा हिरे यांच्याकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये त्यांनी आपल्या गाडीला किरकोळ अपघात झाला असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हटले आहे. परंतु, यामध्ये त्यांनी मारहाणीच्या घटनेविषयी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. 
 

Web Title: MLA Seema hire met with an accident in Kasara

टॅग्स :Accidentअपघात