आमदार अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 16:44 IST2021-07-12T16:44:24+5:302021-07-12T16:44:31+5:30
MLA Amol Mitkari paralyzed : एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

आमदार अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे या काल अकोला दौऱ्यावर होत्या. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बी फार्म कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. अमोल मिटकरी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भाषणाचा समारोप करताना शेवटी त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकड राहिली… माझ्या मनाची होतीया काहिली’ हे गाण गायला सुरुवात केली. गात असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. तेथे उपस्थितांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
अमोल मिटकरी यांनी स्वत: एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ‘माझी प्रकृती आता सुधारते आहे. चिंता करण्यासारखं काही नाही. सध्या करोनाचा काळ असल्याने कुणीही मला भेटायला येऊ नये, अशी विनंती मिटकरी यांनी कार्यकर्ते, मित्रमंडळी व हिंतचिंतकांना केली आहे.