शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांचे निवेदन दिशाभूल करणारे- विखे पाटील

By admin | Updated: March 16, 2017 19:37 IST

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेले निवेदन म्हणजे केवळ एक दिशाभूल आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेले निवेदन म्हणजे केवळ एक दिशाभूल आहे. कर्जमाफी करण्याबाबत सरकारची भूमिका प्रामाणिक नाही. त्यामुळेच कर्जमाफीचा एक ओळीचा ठराव मांडायला सरकार तयार नसल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी कर्जमाफीसंदर्भात दिलेल्या निवेदनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी विखे पाटील म्हणाले की, कर्जमाफीची घोषणा करण्याऐवजी सरकार विरोधी पक्षांवर बिनबुडाचे आरोप करून राज्याची दिशाभूल करीत आहेत. विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील अनेक नेते सात-बारा कोरा करण्याची मागणी करीत होते. आता सत्तेत आल्यानंतरच त्यांना कर्जमाफी देण्यात अडचणी असल्याचा साक्षात्कार झाला आहे, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेत्यांनी केली. शेतकरी कर्जमाफी झाल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. पंतप्रधानांसोबत निव्वळ चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. त्याऐवजी राज्य सरकारने अगोदर विधानसभेत कर्जमाफीची घोषणा करावी. त्यानंतर कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली एकूण रक्कम आणि त्यामध्ये केंद्राकडून अपेक्षित असलेले आर्थिक योगदान, याबाबत एक प्रस्ताव तयार करून पंतप्रधानांकडे जावे. पंतप्रधानांकडे नेमके काय मागायचे, हेच ठाऊक नसताना त्यांच्याशी चर्चा करणे निरर्थक सिद्ध होईल, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.तत्पूर्वी विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेत्यांनी विदर्भ-मराठवाड्यातील गारपीट व अवकाळी पावसाचा मुद्दा उपस्थित केला. या नव्या संकटाने शेतकऱ्यांची स्थिती अधिक बिकट झाल्याचे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान गुरुवारी सकाळी देखील विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर विरोधी पक्षांच्या आमदारांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी जोरदार नारेबाजी केली. मागील आठवड्यापासून रोज सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांचे हे आंदोलन सुरू आहे.