शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

बेपत्ता अश्विनी बिद्रेची हत्या करून खाडीत मृतदेह फेकल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 2:58 AM

बेपत्ता पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्याचा साथीदार राजेश पाटीलने हत्या करून त्यांचा मृतदेह भार्इंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय दोघांच्याही टॉवर लोकेशनवरून वर्तवण्यात येत आहे. यासाठी कुरुंदकर यांची गाडी वापरल्याची माहितीही समोर येत आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत़

मुंबई : बेपत्ता पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्याचा साथीदार राजेश पाटीलने हत्या करून त्यांचा मृतदेह भार्इंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय दोघांच्याही टॉवर लोकेशनवरून वर्तवण्यात येत आहे. यासाठी कुरुंदकर यांची गाडी वापरल्याची माहितीही समोर येत आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत़नवी मुंबई मानवाधिकार विभागात कार्यरत असलेल्या बिद्रे यांचे ठाणे ग्रामीणचे कुरुंदकर यांच्याशी विवाहबाह्य संबंध होते. कुरुंदकर यांना पत्नी व दोन मुले आहेत. बिद्रे यांनी कुरुंदकर यांच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. यामुळे कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोज भांडणे होत होती. कुरुंदकर यांनीच बिद्रे यांचा काटा काढल्याचा संशय आहे. ११ एप्रिल २०१६ रोजी बिद्रे कळंबोली येथील घरातून निघाल्या. तेथून त्या सायंकाळी ६ च्या सुमारास कळंबोली रेल्वे स्थानकावरून कुरुंदकरला भार्इंदर भेटायला गेल्या. रात्री ११ च्या सुमारास त्यांचा मोबाइल बंद होता. रात्री २.४० वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्यांचा साथीदार राजेश पाटील (माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा) यांचे मोबाइल टॉवर लोकेशन भार्इंदर पुलावरील येत आहे.अश्विनीची हत्या करून कुरुंदकरने त्यांना याच खाडीत फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. यासाठी कुरुंदकरने त्यांच्या लाल रंगाच्या फोक्स वॅगन (वाहन क्रमांक एमएच १० ए एन ५५००) या गाडीचा वापर केला असल्याचे समोर येत आहे. ही गाडी सांगलीच्या धामणी रोड येथील जीनेश्वर कॉलनीतील रहिवासी रमेश चारुदत्त जोशी यांच्या नावावर आहे. त्याने ही गाडी कुरुंदकरला भेट दिल्याचे समोर येत आहे. जुलै २०१६ मध्ये कळंबोली पोलिसांनी बिद्रे यांच्या इमारतीखालील दोन सुरक्षारक्षकांचे जबाब नोंदविले होते.कुरुंदकर यांच्या घरातून रक्ताचे डाग असलेला टॉवेल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा टॉवेल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. यावरून हे रक्त बिद्रे यांचे आहे का, हे तपासण्यासाठी बिद्रे यांचे पती राजू गोरे व आठ वर्षांच्या मुलीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. दोन्ही रक्ताचे नमुने डीएनएसाठी पाठविण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.मच्छीमारांचे जबाब नोंदविलेबिद्रे यांची हत्या केल्याच्या काही दिवसांनंतर कुरुंदकर भार्इंदरच्या खाडीला भेट देत होते. तेथील स्थानिकांशी संपर्क साधून एक मृतदेह आढळला का याची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी काही मच्छीमारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हत्या झाल्यानंतर बिद्रे यांच्या वडिलांना कुरुंदकरने काही दिवस उत्तराखंडमध्ये मेडिटेशनला जात असल्याचा संदेश मोबाइलवरून पाठवला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण