Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 17:28 IST2026-04-07T17:26:14+5:302026-04-07T17:28:15+5:30

Devendra Fadnavis On Mira-Bhayander Flyover: मुंबई मेट्रो मार्ग ९ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन सोहळ्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा-भाईंदरमधील वादग्रस्त उड्डाणपुलावर भाष्य केले आहे.

Mira-Bhayander Flyover Row: CM Devendra Fadnavis Cites Lack of Space for Narrowing Lanes | Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा

Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज  मुंबई मेट्रो मार्ग ९ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. दहिसर पूर्व ते काशिगाव दरम्यान धावणारी ही मेट्रो बुधवारपासून सर्वसामान्य जनतेसाठी खुली होणार असून मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या उद्घाटन सोहळ्यादरम्यान फडणवीसांनी जगभरात चर्चेत आलेल्या मिरा-भाईंदरमधील वादग्रस्त उड्डाणपुलाच्या रचनेवर प्रतिक्रिया दिली. 

मिरा-भाईंदरमध्ये मेट्रो मार्गासोबतच एक उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. मात्र, या पुलाच्या रचनेवरून नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. हा पूल सुरुवातीला चार मार्गिकांचा आहे. परंतु, फाटकाजवळ उतरताना तो अचानक दोन मार्गिकांचा होतो. या उड्डाणपूलाच्या रचनेमुळे भविष्यात मोठी वाहतूक कोंडी होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली असून एमएमआरडीएवर जोरदार टीका केली होती.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मिरा-भाईंदरमधील पुलावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हा पूल अत्यंत गर्दीच्या परिसरात तयार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी पूल बांधण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही, हे वास्तव सर्वांना ठाऊक आहे. पुलाचे काम पूर्ण होण्याआधीच त्याचे फोटो काढून वाद निर्माण करण्यात आला." ते पुढे म्हणाले की, "मी यासंदर्भात एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. सध्या तुम्ही केवळ अर्धवट डिझाइन पाहिले आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर फार मोठे बदल होतील असे मी म्हणणार नाही, कारण तिथे जागाच कमी आहे. परंतु, तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार पूलाचे काम पूर्ण केले जाईल."

मुंबईतील कार्यान्वित मेट्रो कॉरिडॉर्सच्या संख्येत वाढ

'मुंबई मेट्रो मार्ग ९' च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर मुंबईतील कार्यान्वित मेट्रो कॉरिडॉर्सची संख्या आता पाच झाली असून, मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. मेट्रो ९ च्या समावेशामुळे मुंबईत आता खालील पाच महत्त्वाचे मार्ग प्रवाशांच्या सेवेत आहेत, ज्यात  घाटकोपर–अंधेरी–वर्सोवा (मार्ग १), अंधेरी पश्चिम–दहिसर पूर्व (मार्ग २ ए), दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व (मार्ग ७) आणि कुलाबा ते बीकेसी आणि SEEPZ (मार्ग ३- अॅक्वा लाइन) यांचा समावेश आहे. 

Web Title : मीरा-भायंदर फ्लाईओवर के बोतल आकार पर फडणवीस का स्पष्टीकरण: एमएमआरडीए का काम समझाया

Web Summary : फडणवीस ने मुंबई मेट्रो लाइन 9 का उद्घाटन किया और मीरा-भायंदर फ्लाईओवर के डिजाइन पर चिंताओं को संबोधित किया। उन्होंने जगह की कमी का हवाला दिया और पूरा होने के बाद निर्णय लेने का आग्रह किया। नई मेट्रो लाइन मुंबई के परिचालन गलियारों को पांच तक विस्तारित करती है, जिससे यात्रियों का आवागमन आसान हो जाता है।

Web Title : Fadnavis clarifies Mira-Bhayandar flyover's bottle shape: MMRDA's work explained.

Web Summary : Fadnavis inaugurated Mumbai Metro Line 9, addressing concerns about the Mira-Bhayandar flyover's design. He cited space constraints and urged judgment after completion. The new metro line expands Mumbai's operational corridors to five, easing commuter travel.