शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाचा अत्याचार

By admin | Updated: August 2, 2014 02:49 IST

एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेली दोन वर्षे सावत्र बापाचा लैंगिक अत्याचार सुरू असल्याचा प्रकार पूर्वेत उघडकीस आला असून बापाच्या या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश पीडित मुलीनेच केला आहे

कल्याण : एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेली दोन वर्षे सावत्र बापाचा लैंगिक अत्याचार सुरू असल्याचा प्रकार पूर्वेत उघडकीस आला असून बापाच्या या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश पीडित मुलीनेच केला आहे. दरम्यान या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शमसुद्दीन निप्पलवाला (५८) या नराधमाने न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर १४ आॅगस्टला सुनावणी होणार आहे. सावत्र बापाच्या सुरू असलेल्या अत्याचाराबाबत पीडित मुलीने आपल्या आईला सांगितले होते़ परंतु, आईचा यावर विश्वास बसत नव्हता़ उलट आईकडून तिची समजूत काढली जात होती. त्यामुळे पीडित मुलीने आत्महत्या करण्याचा निर्णयदेखील घेतला होता. याबाबत तिने लिहिलेले पत्र तिच्या आईच्या हाती लागले. हे पत्र वाचून पुन्हा तिला समजावण्यात आले. याप्रकरणी आईकडून शमसुद्दीनला जाब विचारण्यात आला. मात्र, त्याने याचा इन्कार केला. दुसरीकडे शमसुद्दीनच्या वाढत असलेल्या लीला अत्याचारपीडित मुलीने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या आणि आईला दाखवल्या़ त्या पाहून तिने मुलीसह थेट कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले आणि शमसुद्दीनविरोधात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान शमसुद्दीनने जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता़शुक्रवारी सुनावणीदरम्यान पीडित मुलीचे वकील आर.ए. नायर यांनी जामिनाला विरोध केला आहे. ही सुनावणी १४ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. (प्रतिनिधी)