शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"संजय शिरसाट काय म्हणतात त्याला काही महत्त्व नाही"; शिवसेना नेत्यांच्या समेटावर योगेश कदमांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 16:34 IST

मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे विधान केल्यानंतर मंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली.

Yogesh Kadam on Sanjay Shirsat: विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर राज्याच्या राजकारणात अनेक हालचाली सुरुच आहेत. उद्धव ठाकरेंच्या दारूण पराभवानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ऑपरेशन टायगर सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत समावेश करण्यात येत आहे. अशातच एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेनेच्या गटामध्ये समेट घडवून आणण्यासंदर्भात विधान केल्यानंतर जोरदार राजकीय चर्चा सुरु झालीय. मात्र आता संजय शिरसाट काय म्हणातात याला महत्त्व नाहीये असं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

दोन्ही शिवसेना वेगळ्या झाल्याचं आपल्याला दुःख आहे. पण आपल्याला कधी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्याची संधी मिळाली तर नक्कीच प्रयत्न करेन, असं विधान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलं. एका मुलाखतीदरम्यान शिरसाट यांनी केलेल्या या विधानाचे आता पडसाद उमटत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेत्यांनी शिरसाट यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील मंत्र्यांनेही संजय शिरसाट यांच्या विधानावर भूमिका स्पष्ट केली. संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीमध्ये काही महत्त्व नाही, असं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं.

पक्षाचे सगळे अधिकार एकनाथ शिंदेंकडे - योगेश कदम

"पक्षाची भूमिका एकनाथ शिंदे ठरवतील. एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला त्यावेळी आम्ही पक्षाच्या निर्णयाचे सर्व अधिकार फक्त एकनाथ शिंदे यांनाच दिले आहेत. ते दुसऱ्या कोणालाही नाहीत. त्यामुळे संजय शिरसाट काय म्हणतात याला महायुतीमध्ये महत्त्व नाही. कारण त्यांचे ते वैयक्तिक मत आहे," असं मंत्री योगेश कदम म्हणाले.

तारा जुळल्या तर हरकत नाही - संजय शिरसाट

"दोन शिवसेना झाल्या याचं फार दु:ख होतं.  मला आजही हे आवडत नाही. आजही माझ्या मनाला यातना होतात. ठाकरे गटातील नेता किंवा पदाधिकारी भेटतात त्यांचं आणि आमचं नातं तसंच आहे. मात्र, मनामध्ये जे अंतर पडलं आहे, तो त्या पक्षात, मी या पक्षात असं जे झालं आहे हे आवडत नाही. दोन्ही नेत्यांना आपुलकीने बोलायची आणि एकत्र आणण्याची संधी आली तर मी प्रयत्न करेन. पण दोघांची तार जुळली पाहिजे. त्या दोघांची तार जुळत असेल तर त्यासाठी माझा काहीही आक्षेप नाही. ज्यांचं कधी तोंड पाहण्याची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर ते जाऊन बसले. माझी चूक तुम्ही माफ करू शकता, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. एकदा जर त्या तारा जुळल्या तर कोणत्याही गोष्टीला हरकत नाही," असं संजय शिरसाट म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेYogesh Kadamयोगेश कदम