Satej Patil : वाहनांची आंतरराज्य वाहतूक करणे आता होणार सोपे, वाहतूक राज्यमंत्री सतेज पाटील यांची नवी बीएच मालिकेची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 05:11 AM2021-10-26T05:11:41+5:302021-10-26T05:12:28+5:30

Satej Patil : गेल्या तीन वर्षांत इंधनाच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. दिवसेंदिवस दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते.

Minister of State for Transport Satej Patil announces new BH series | Satej Patil : वाहनांची आंतरराज्य वाहतूक करणे आता होणार सोपे, वाहतूक राज्यमंत्री सतेज पाटील यांची नवी बीएच मालिकेची घोषणा

Satej Patil : वाहनांची आंतरराज्य वाहतूक करणे आता होणार सोपे, वाहतूक राज्यमंत्री सतेज पाटील यांची नवी बीएच मालिकेची घोषणा

googlenewsNext

मुंबई : एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतूक करणाऱ्या वाहनांकरिता महाराष्ट्र सरकारने सोमवारपासून वाहनांच्या नंबरप्लेटसाठी बीएच (भारत) ही नवी मालिका सुरू केल्याची घोषणा केली. या नव्या मालिकेमुळे वाहनांना सहजरीत्या आंतरराज्य वाहतूक करणे शक्य होणार असल्याचा विश्वास वाहतूक, गृह आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

गेल्या तीन वर्षांत इंधनाच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. दिवसेंदिवस दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला.

पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात आजपासून बीएच ही मालिका सुरू झाली आहे आणि नागरिक त्यांची नवीन कार आनंदाने स्वीकारत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करू शकतील. आम्ही दिलेल्या वचनाला अनुसरून महाराष्ट्रात सोमवारपासून बीएच मालिकेची नोंदणी सुरू झाली आहे. दिवाळीपूर्वी तुम्ही तुमच्या नव्या कारची डिलिव्हरी स्वीकारू शकतात आणि सहजरीत्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात दीर्घ प्रवास करू शकतात. नंबरप्लेटवर बीएच मालिकेमुळे वाहनमालकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सहज जाता येईल. पूर्वी अनेकदा नोंदणीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागत होते. नवीन नोंदणी पद्धत डिजिटल पद्धतीने होणार आहे.

किचकट प्रक्रिया झाली रद्द
आतापर्यंत मोटर वाहन कायदा १९८८ नुसार एका राज्यात नोंदणी केलेली गाडी दुसऱ्या राज्यात बारा महिन्यांपेक्षा अधिक काळ ठेवल्यास नव्याने नोंदणी करावी लागत होती. परंतु, बीएच मालिकेमुळे ही किचकट प्रक्रिया आता रद्द झाली आहे. नोंदणीच्यावेळी जीएसटी आकारणीबाबत पाटील म्हणाले की, कायद्यानुसार, जीएसटी हा होमोलोगेशन किमतीवर आधारित असून, तो वाहन पोर्टलवर देण्यात आलेला आहे. मोटार वाहन कर शेवटी निश्चित केला जातो. महाराष्ट्रात याची चोखपणे अंमलबजावणी केली जाईल.

Web Title: Minister of State for Transport Satej Patil announces new BH series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.