"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:57 IST2025-10-09T15:41:13+5:302025-10-09T15:57:06+5:30

सचिन घायवळला बंदुकीचा परवाना देण्यासाठी योगेश कदम यांनी स्वाक्षरी केल्याच्या प्रकरणावरुन विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागमी केली आहे.

Minister of State for Home Affairs Yogesh Kadam explained the reason for granting arms license to Sachin Ghaywal | "सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण

"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण

Yogesh Kadam Gun License to Sachin Ghaywal: कोथरूड गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या आरोपी नीलेश घायवळ याच्या भावाला शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली. अनेक गुन्हे दाखल असलेल्या सचिन घायवळला बंदुकीचा परवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वाक्षरी केल्याचा आरोप विरोधकांनी केली. आता गृहराज्यमंत्री कदम यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. खुर्चीवर बसल्यापासून गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला परवाना देण्याची शिफारस केलेली नाही, असं योगेश कदम यांनी म्हटलं.

कुख्यात गुंड निलेश घायवळ विदेशात फरार झाल्यामुळे पुणे पोलिसांकडून त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जात आहे. या कारवाईदरम्यान, निलेश घायवळ याच्या भावाला  गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्वाक्षरीने शस्त्र परवाना मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर आता योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली.

"परवाना जेव्हा दिला जातो तेव्हा तो संबधित पोलीस आयुक्तांच्या सहीने इश्यु होते. मी याबाबत सर्व सविस्तर माहिती आवश्यक असल्यास पत्रकार परिषद घेऊन देईन. मी या खूर्चीवर बसल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडून लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही. या भूमिकेवर मी ठाम आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचे काम आजपर्यंत आमच्याकडून झालेलं नाही. आता जे काही आरोप केले जात आहेत त्याची सगळी सविस्तर माहिती कागदपत्रांसोबत मी देईन," असे योगेश कदम यांनी सांगितले.

"ज्यावेळी अपील केले जाते ती वैयक्तिकरित्या अपील केलेले असते. मग तो कुणाचा भाऊ आहे कुणाचा नातेवाई आहे पण विषय त्या व्यक्तीचे कॅरेक्टर कसे आहे याचा असतो. याबाबतीत सचिन घायवळवर जे काही गुन्हे दाखल होते त्यातून २०१९ मध्ये कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. मागच्या दहा वर्षात सचिन घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मी निर्णय घेतलेला आहे," असंही योगेश कदम म्हणाले.

योगेश कदम यांची हकालपट्टी करा - अनिल परब

"मी मुख्यमंत्र्यांना भेटणार असून योगेश कदम यांच्या हाकालपट्टीची मागणी करणार आहे. कोणाचाही दबाव असेल आपल्याला आपल्याला जबाबदारीने काम केलं पाहिजे. गुन्हे नाहीत हा पोलिसांचा रिपोर्ट आहे पण पोलिसांचा हा सुद्धा रिपोर्ट आहे की हा गुंडाचा भाऊ आहे, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. सचिन घायवळ याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न व खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला शस्त्रपरवाना दिला नाही," असं अनिल परब म्हणाले.

Web Title : सचिन घायवल को शस्त्र लाइसेंस: मंत्री ने आरोपों का खंडन किया

Web Summary : मंत्री योगेश कदम ने सचिन घायवल को शस्त्र लाइसेंस जारी करने का बचाव किया, जो वांछित अपराधी नीलेश घायवल का भाई है। कदम ने कहा कि घायवल 2019 में बरी हो गया था और उसका कोई हालिया आपराधिक रिकॉर्ड नहीं है।

Web Title : Minister Defends Gun License for Sachin Ghaywal Despite Criminal Charges

Web Summary : Minister Yogesh Kadam clarified issuing a gun license to Sachin Ghaywal, brother of wanted criminal Nilesh Ghaywal. Kadam stated Ghaywal was acquitted in 2019 and has no recent criminal record, justifying the decision.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.