मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 06:59 IST2025-11-05T06:58:58+5:302025-11-05T06:59:22+5:30
लोकांमध्ये नाराजी आहे, प्रशासनाने तातडीने मदत पोहोचविणे गरजेचे आहे, असे ते कडाडले.

मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पूरग्रस्तशेतकरी आणि नागरिकांना राज्य सरकारची मदत अजूनही पोहोचत नसल्याबद्दल पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांगलेच संतापले. लोकांमध्ये नाराजी आहे, प्रशासनाने तातडीने मदत पोहोचविणे गरजेचे आहे, असे ते कडाडले.
राज्य मंत्रिमंडळाने मदतीची घोषणा केली, कोट्यवधी रुपये मंजूरदेखील केले. ते पूरग्रस्तांपर्यंत तातडीने पोहोचविणे आवश्यक आहे. मदत पोहोचविण्यात प्रशासनाला अपयश आले तर त्याची नाराजी आमच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून येते, असा उद्वेग पाटील यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली. तातडीने मदत पोहोचविली गेली तर ग्रामीण भागातील नाराजीची तीव्रता कमी होईल. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्वत:च मदत तातडीने पोहोचविण्याचे निर्देश दिले होते, असे पवार म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.