शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 16:08 IST

मंत्री गिरीश महाजन यांनी बांधकाम कामगारांना मच्छरदाणीत झोपण्याचा सल्ला दिला.

Girish Mahajan: राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी बांधकाम कामगारांसाठी असलेल्या सरकारी योजनांवर बोलताना केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी बांधकाम कामगारांना उपरोधात्मक सल्ला दिला. मात्र गिरीश महाजन यांनी दिलेल्या सल्ल्याची सर्वत्र चर्चा सुरु झालीय. या वक्तव्यानंतर महाजन यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला.

बांधकाम कामगारांना मच्छरदाणीत 'झोपण्याचा' सल्ला

भडगाव येथील सभेत बोलताना गिरीश महाजन यांनी बांधकाम कामगारांसाठी असलेल्या सरकारी सुविधांचा उल्लेख केला. याच संदर्भात, कामगारांना सरकारने दिलेल्या वस्तूंपैकी मच्छरदाणीचा उल्लेख करताना त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. बांधकाम कामगारांना सरकारने मच्छरदानी दिली आहे. त्यामुळे थकून आल्यावर मच्छरदाणीत बायकोसोबत झोपा असा सल्ला गिरीश महाजन यांनी दिला. भडगाव येथील जाहीर सभेत गिरीश महाजन बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते.

गिरीश महाजन म्हणाले:

"बांधकाम करणाऱ्या कामगारांना पेट्या मिळाल्या आहेत. त्यामध्ये ग्लोव्हज दिले, बॅटरी दिली, डब्बा दिला, मच्छरदानी पण दिली. कामगार घरी थकून भागून गेल्यानंतर नवरा बायकोने मच्छरदानीत झोपा. डास चावता कामा नये." महाजन यांच्या या वक्तव्यामुळे सभेत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला.

कामगारांच्या योजनांवर बोलताना महाजन यांनी हे उपहासात्मक विधान केले असले तरी, त्यांच्या बोलण्याचा नेमका रोख सरकारी योजनांची अंमलबजावणीवर होता असं म्हटलं जात आहे.  गिरीश महाजन यांच्या राजकीय वक्तव्यांची शैली नेहमीच चर्चेचा विषय ठरते. मात्र आता त्यांचे'मच्छरदाणी आणि झोपण्याचे' वक्तव्य विरोधकांना आयतेच कोलीत ठरले आहे. या वक्तव्यावरून येणाऱ्या काळात राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Minister's mosquito net advice to construction workers sparks controversy.

Web Summary : Minister Girish Mahajan's jocular advice to construction workers – to sleep with their wives in mosquito nets provided by the government – has stirred controversy. His remarks, intended to highlight government schemes, have drawn criticism and are likely to fuel political reactions.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Girish Mahajanगिरीश महाजनLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकBJPभाजपा