शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज माफ करणार नाहीत - दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 12:30 IST

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. तर उबाठा पक्ष १ जुलै रोजी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मागील एक वर्षात झालेल्या महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी जाब विचारण्यासाठी महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटातील नेते सातत्याने मोठी विधाने करत आहेत. अशातच मंत्री दीपक केसरकर यांनी एक विधान करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. 

जी लोक १ जुलैला मोर्चा काढत आहेत त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नसल्याची टीका केसरकरांनी केली. "खोटं किती बोलावं याला प्रमाण असते. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी खरं बोलायला शिकायला हवं", असे केसरकरांनी ठाकरेंची सुरक्षा हटवली असल्याच्या प्रश्नावर बोलताना म्हटले. ते पत्रकारांशी बोलत होते. 

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केसरकर म्हणाले की, औरंगजेबाबद्दलचे नवे प्रेम झाले असेल तर त्यांनी ते सांगावे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राज्य चालवत आहोत. छत्रपती संभाजी महाराज आणि मराठी सरदारांना आम्हाला विसरता येणार नाही. उद्धव ठाकरेंचे औरंगजेबाबद्दलचे नवे प्रेम पाहायला मिळते आहे. हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कधीच माफ करणार नाहीत. तसेच सत्तेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची लाचारी केली हे ठाकरेंनी कबुल करावे. 

अलीकडेच केसरकरांनी एक मोठा गौप्यस्फोट करून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. "गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पुकारलेले बंड यशस्वी झाले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: डोक्यात गोळी झाडून घेणार होते", असे विधान मंत्री दीपक केसरकर यांनी केले.  

 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजHindutvaहिंदुत्व