Minister Chhagan Bhujbal News: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा राजकीय वर्तुळात वेगाने चर्चेत आला. अपघातापूर्वी अजित पवार आणि शरद पवार गटातील नेते जयंत पाटील यांच्यात बऱ्याच बैठका झाल्या होत्या. याच बैठकातून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याशिवाय निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा होणार होती. १२ फेब्रुवारी ही तारीखही ठरण्यात आली होती असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते करत होते. त्यातच आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्याची अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळत आहे.
डॉ. अमोल कोल्हे हे संयुक्तिक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले असते, ती अजितदादांची इच्छा होती. अजितदादांच्या इच्छेप्रमाणे अमोल कोल्हे फार प्रामुख्याने पुढाकार घेत होते. अजितदादांना पक्ष वाढवायचा होता. अमोल कोल्हे यांनीही विलीनीकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे बोललेत. ज्यांच्या घरी बैठका झाल्या ते जयंत पाटील बोललेत. १३ बैठका झाल्या होत्या, असे दावे रोहित पवार यांनी केले होते. हे दावे छगन भुजबळ यांनी फेटाळून लावले.
कोणी काही म्हणत असले तरी आपण त्यावर काय बोलणार?
आता हे सगळे वेगवेगळे दावे करत आहेत, त्यांच्याबरोबर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे ठरवले होते असे ते म्हणतात. मात्र, अजित पवार यांनी आम्हाला काही सांगितलेच नाही. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले सुद्धा नाही, त्याआधीच कोण कुठल्या पदावर बसणार हे ठरवून टाकले होते. मग त्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण असेल? हेही ठरले असेल. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? हे ठरले असेल. आता कोणी काहीही म्हणत असले तरी आपण त्यावर काय बोलणार?, असे भुजबळ म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काम हातात घेतले आहे त्यांना पूर्णपणे सहकार्य करणार आहोत. आमच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई आहे त्यांच्याशी बोलावे. नवीन उपमुख्यमंत्री आहेत त्या ठरवतील, असेही भुजबळ यांनी सांगितले. तसेच कोणीही किती काही शंका निर्माण केल्या. माझे म्हणणे इतकेच आहे की शंका पुरावे असतील तर वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआयच्या चौकशीची मागणी केली. गृहमंत्री अमित शहा यांना सांगतो की तुम्ही पण चौकशी करा. चौकशी करून किती तथ्य त्याच्यामध्ये आहे ते समजेल, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
Web Summary : Chhagan Bhujbal dismisses Rohit Pawar's claim of a planned NCP merger before Ajit Pawar's move. Bhujbal states Ajit Pawar never mentioned merger plans. Bhujbal questions pre-decided roles and supports investigation into allegations against Sunetra Pawar.
Web Summary : छगन भुजबल ने रोहित पवार के अजित पवार के कदम से पहले एनसीपी विलय की योजना के दावे को खारिज किया। भुजबल ने कहा कि अजित पवार ने कभी विलय योजनाओं का उल्लेख नहीं किया। भुजबल ने पूर्व-निर्धारित भूमिकाओं पर सवाल उठाया और सुनेत्रा पवार के खिलाफ आरोपों की जांच का समर्थन किया।