शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएम, मनसे आम्हांला नको : अशोक चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 17:55 IST

आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी व अन्य पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे,

ठळक मुद्देमित्र पक्षांकडूनही एमआयएम किंवा मनसे यांना नको पुण्यात काँग्रेसच्या जनसंघर्ष सभेपुर्वी पत्रकार परिषद शेतकऱ्यांना पुन्हा संप करण्याची वेळ येते हे दुर्दैवदुष्काळाची घोषणा फक्त कागदावरच

पुणे: आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी व अन्य पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे. मात्र, आम्हांला एमआयएम किंवा मनसे यांपैकी कोणीही नको आहे. आमच्या मित्र पक्षाकडूनही त्यांच्यासाठी नकारच आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत ते म्हणाले, ते आले तर आनंदच होईल मात्र त्यांना एमआयएमची साथ सोडावी लागेल  पुण्यात काँग्रेसच्या जनसंघर्ष सभेपुर्वीच्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, पुण्याची जागा आमचीच आहे, ती आम्ही लढवू. निवडून येण्याची क्षमता हीच गुणवत्ता आहे, निवडणूक आयोगाने दिलेला खर्च करण्याची क्षमता हाही निकष आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क सांगितला असला तरी आम्हीही आग्रही आहोत. पुण्याची जागा लढवण्यावर ते म्हणाले की, पुण्याची जागा आमचीच आहे, ती आम्ही लढवू, निवडून येण्याची क्षमता हीच गुणवत्ता आहे. निवडणूक आयोगाने दिलेला खर्च करण्याची क्षमता हाही निकष आहे असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क सांगितला असला तरी आम्हीही आग्रही आहोत.मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता. शेतकऱ्यांना पुन्हा संप करण्याची वेळ येते हे दुर्दैव.दोन वर्षांनंतरही कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. दुष्काळाची घोषणा फक्त कागदावरच आहे. विद्यार्थ्यांची फी माफी, चारा यापैकी कोणत्याही उपाययोजना प्रत्यक्ष कार्यरत नाहीत.मुख्यमंत्री फक्त क्रिकेटमध्ये मग्न आहेत. पंतप्रधानांनी स्वतः म्हटलंय लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचं मत पंतप्रधानांच्या मतापेक्षा वेगळं आहे असं म्हणावं लागेल.

राहूल गांधी मराठवाड्यातील नांदेडमधुन लढणार ही चर्चा कुठुन सुरू झाली माहिती नाही. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील कुठल्याही मतदारसंघातुन निवडून येऊ शकतात. पण ते नांदेडमधुन निवडणूक लढवणार याबाबत मला तरी काही माहिती नाही.

टॅग्स :PuneपुणेAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीMNSमनसेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण