शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

माध्यान्ह भोजनाची होणार तपासणी

By admin | Updated: February 11, 2016 01:36 IST

शाळांमधील माध्यान्ह भोजनाबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन त्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून

अमरावती : शाळांमधील माध्यान्ह भोजनाबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन त्याची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ही तपासणी होणार आहे. यासाठी निवड झालेल्या शाळा तसेच केंद्रीय स्वयंपाक गृहांमधून शिजणाऱ्या अन्नाचे नमुने महिन्यातून एकदा तपासणीसाठी पाठवावेत, असे आदेश शासनाच्या उपसचिव सुवर्णा खरात यांनी दिले आहेत. माध्यान्ह भोजन योजनेचा (शालेय पोषण आहार योजना) समावेश राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मध्ये करण्यात आला आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाने या योजनेची नियमावली २०१५ मध्ये जाहीर केली आहे. या नियमावलीतील तरतुदी विचारात घेऊन शालेय शिक्षण विभागाने योजनेच्या अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या आहेत. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळा, मदरसा, मक्तबा (सर्व शिक्षा अभियान सहायिता) येथे ६ ते १४ वयोगटातील इयत्ता पहली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या व उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांस दररोज (शाळेच्या सुट्टी व्यतिरिक्त) पोषण मूल्ययुक्त मोफत आहार दिला जावा आणि शिजविलेल्या आहाराचे वाटप केवळ शाळेतच करावे तसेच प्रत्येक शाळेत आरोग्यदायी व चवदार आहार शिजविण्याची सुविधा उपलब्ध करावी, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरी भागामध्ये आवश्यकतेनुसार केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार शिजवून त्याचे वाटप शाळेतच करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने या आठवड्यात दिल्या आहेत. अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींनुसार माध्यान्ह भोजन योजनेची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याचा आढावा राज्यस्तरीय संनियंत्रण समितीने घ्यावा व आहाराची पोषण मूल्ये व गुणवत्ता राखण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी, असे आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)इंधन, भाजीपाला उपलब्ध न झाल्यास, स्वयंपाकी, मदतनीस अनुपस्थित असल्यास अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव शाळेच्या दिवशी शाळेमध्ये मध्यान्ह भोजन न दिल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांस अन्नसुरक्षा भत्ता पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या आत द्यावा, असे निर्देश आहेत.अमरावती जिल्ह्यात माध्यान्ह भोजनाचे नमुने घेण्यास सुरुवात झालेली नाही. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात असे नमुने घेऊन कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातहीा असे नमुने घेण्यात येतील. -मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त अन्न व औषधी विभाग.