MHADA Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 14:36 IST2025-07-19T14:24:56+5:302025-07-19T14:36:43+5:30
How to Apply MHADA Lottery 2025: स्वत:चे घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

MHADA Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
स्वत:चे घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडून ५ हजार ६३२ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली. या घरांमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे उपलब्ध असणार आहेत. ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.
मुंबईसारख्या महागड्या शहरात घरांचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्यांच्या खिशाला ते परवडत नाहीत. अशा लोकांसाठी म्हाडा आणि सिडकोसारख्या सरकारी संस्था परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देतात, म्हणूनच दरवर्षी हजारो अर्जदार या योजनांकडे आशेने पाहत असतात.
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
- अर्जदाराला सर्वात प्रथम म्हाडाची अधिकृत वेबसाइट https://lottery.mhada.gov.in भेट द्या.
- त्यानंतर अर्जदाराला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल आणि त्याचे नाव,मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि त्पन्न गटाची माहिती द्यावी लागते.
- नोंदणी झाल्यावर लॉगिन करून हवी असलेली योजना निवडावी व अर्ज भरावे.
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे.
- अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ठराविक अनामत रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरावे.
- सर्व माहिती आणि कागदपत्रे योग्यरित्या भरल्यानंतर अर्ज सबमिट करा
म्हाडा शिरढोण सँपल फ्लॅट Video
.
आवश्यक कागदपत्रांची यादी:
१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३) डोमेसाईल सर्टिफिकेट (महाराष्ट्रातील स्थायिक असल्याचा पुरावा)
४) उत्पन्नाचा दाखला (संबंधित उत्पन्न गटासाठी)
५) बँक पासबुक किंवा बँक स्टेटमेंट
६) पासपोर्ट साईझ फोटो
७) स्वाक्षरीचा फोटो
महत्त्वाची माहिती: सर्व कागदपत्रे स्कॅन करून PDF/JPEG स्वरूपात अपलोड करावे. अधिक माहितीसाठी https://lottery.mhada.gov.in येथे भेट द्या.