शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘मेट्रो’ ट्रॅकवर!

By admin | Updated: August 14, 2014 01:26 IST

उपराजधानीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाने आणखी एक टप्पा पार केला आहे. दिल्ली येथे बुधवारी झालेल्या पीआयबी(पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड)च्या बैठकीत या नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे

दिल्लीत पीआयबीच्या बैठकीत सादरीकरण : ८,६८० कोटी रुपयांचा प्रकल्पनागपूर : उपराजधानीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाने आणखी एक टप्पा पार केला आहे. दिल्ली येथे बुधवारी झालेल्या पीआयबी(पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड)च्या बैठकीत या नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे यांनी या प्रकल्पाचे यशस्वी सादरीकरण केले. दुरुस्त्या व सुधारणानंतर ८ हजार ६८० कोटी रुपयांचा हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे ‘नागपूर मेट्रो’ ट्रॅकवर आला आहे. पीआयबीच्या बैठकीला केंद्रीय अर्थ व लेखा सचिव, केंद्रीय नगरविकास मंत्रालयाचे वरिष्ठ सचिव, केंद्रीय नियोजन आयोगाचे वरिष्ठ अधिकारी, राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार यांच्यासह या प्रकल्पातील काही अभियंते उपस्थित होते. यावेळी सभापती प्रवीण दराडे यांनी केंद्रीय अर्थ व लेखा सचिवांसमक्ष या प्रकल्पाचे सादरीकरण केले. सादरीकरणात उपस्थित अधिकाऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. दराडे यांनी त्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. ३८.२१ किलोमीटरचा हा प्रकल्प पुढच्या पाच वर्षांत पूर्ण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ आॅगस्ट रोजी नागपुरात मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंडळातही लवकरच मेट्रो रेल्वेला हिरवी झेंडी मिळण्याची चिन्हे आहेत. सादरीकरणानंतर प्रवीण दराडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मिहान ते कामठी रोड आणि प्रजापतीनगर ते लोकमान्य टिळक या दोन मार्गावर मेट्रो धावेल. नागपूर मेट्रो कॉर्पोरेशन असे त्याचे नामकरण करण्यात आले असून, आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. पुढील आठवड्यात भूमिपूजन होण्याची आशा असून, अद्याप तशी अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)