शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

राज्यातील पोलीस दलात 'मेगाबदली', २५ बड्या अधिकाऱ्यांना नवी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 21:56 IST

सध्या रजनीश सेठ हे अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून कार्यरत होते.

ठळक मुद्देमिरा भाईंदर वसई विरारच्या आयुक्तपदी केंद्राच्या प्रतिनियुक्तीवरून परत आलेले आयपीएस अधिकारी सदानंद दाते (मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त पद भूषवलेले आहे)  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई - राज्य पोलीस दलात मोठी उलथापालथ करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 25 अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात नागपूर आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. तसेच मिरा भाईंदर वसई विरारच्या आयुक्तपदी केंद्राच्या प्रतिनियुक्तीवरून परत आलेले आयपीएस अधिकारी सदानंद दाते (मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त पद भूषवलेले आहे)  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) महासंचालक पदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या रजनीश सेठ हे अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून कार्यरत होते. अशा प्रकारे राज्यातील तब्बल 25 अति वरिष्ठांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

गेल्या काही दिवसापासून उत्सुकता लागून राहिलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याना अखेर बुधवारी 'मुहूर्त' मिळाला.  राज्य गुप्त वार्ता विभागाचे प्रमुख रश्मी शुक्ला व अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था ) रजनीश सेठ यांना अनुक्रमे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) व  नागरी संरक्षण विभागात  पदोन्नती देण्यात आली आहे. नवी मुंबईच्या आयुक्तपदी बीपीन कुमार सिह यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदी तर सदानंद दाते यांची मीरा भाईदरच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदल्याच्या यादीला संमती दिल्यानंतर रात्री उशिरा गृह विभागाकडून एकूण 13  अधिकाऱ्यांच्या बदल्याचेआदेश जारी करण्यात आले. 

गुरुवारी व शुक्रवारी आयजी, अप्पर आयुक्त व अधीक्षकाच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात येतील, असे सूत्राकडून सांगण्यात आले.  आघाडी सरकारमधील नेते आणि  पोलीस महासंचालक यांच्यात एक वाक्यता नसल्याने बदल्या लांबणीवर पडल्याचे वृत्त सर्वप्रथम 'लोकमत'ने दिले होते. अखेर गणेशोत्सवनंतर त्यावर तोडगा काढण्यात सरकारला यश आले. 

नवी मुंबईचे आयुक्तपदी एसीबीचे प्रभारी बिपीन कुमार सिह यांची नियुक्ती करण्यात आली असून तेथील  संजयकुमार यांची पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण व खास पथके विभागात बदली करण्यात आली. तर रजनीश सेठ यांची एसीबीचे प्रमुख बनविण्यात आले आहे. त्याचा कायदा व सुव्यवस्था  विभागाचा पदभार राजेंद्र सिह यांच्याकडे देण्यात आला आहे.  राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त  प शुक्ला यांच्या जागी एसीबीतील अपर महासंचालक आशुतोष डुबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या जागी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख  विनयकुमार चोबे यांची बदली करण्यात आली आहे. 

सुमारे एक वर्षांपूर्वी घोषणा केलेल्या मीरा -भाईंदरच्या आयुक्तपदी अखेर सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यापासून ते  नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.  एसआयडीतील सहआयुक्त  अमितेशकुमार यांची पदोन्नतीवर नागपूरच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तेथील आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची राज्य वाहतुक महामार्गच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली आहे. तेथील अप्पर महासंचालक विनय कारगावकर यांना प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. रेल्वेतील अप्पर महासंचालक जयजीत सिह यांची  एसीबीत बदली करण्यात आली आहे. रश्मी शुक्लाही साईडला  फडणवीस यांच्या विशेष मर्जीतील समजल्या जाणाऱ्या एसआयडीच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांची पदोन्नतीवर  तुलनेत साईडला पोस्टिंग देण्यात आली आहे.त्याच्यासाठी होमगार्ड व नागरी संरक्षण हे एकत्र असलेले विभाग स्वतंत्र केले आहेत. त्यांना नागरी संरक्षण विभागाचे प्रमुख बनविले आहे. 

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलाचा तपशील पुढीलप्रमाणे 1. राजेंद्र सिंह (अपर पोलिस महासंचालक (विशेष अभियान), पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई ते अपर पोलिस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, महासंचालक कार्यालय, मुंबई) 2. आशुतोष हावरे (अप्पर पोलिस महासंचालक, अँटी करप्शन विभाग, मुंबई ते आयुक्त, राज्य गुप्तावार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई)3, अमितेश कुमार ( सह आयुक्त, राज्य गुप्तावार्ता विभाग, मुंबई ते पोलिस आयुक्त नागपूर, शहर पध्ततीने)4, जय जीत सिंह (अप्पर पोलिस महासंचालक,रेल्वे, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते अप्पर महासंचालक, अन्टी करप्शन विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई)१. व्ही. के. चौबे (सह पोलिस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, मुंबई शहर ( अप्पर पोलिस महासंचालक दी) ते अप्पर पोलिस महासंचालक, अन्टी करप्शन विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई)

6. सदानंद दाते (केद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत आल्याने प्रतिक्षाधीन ते पोलिस आयुक्त, मीरा - भाईंदर, वसई - विरार ) 

 9.बिपिन कुमार सिंह (अप्पर पोलिस महासंचालक, अॅन्टी करप्शन विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलिस आयुक्त, नवी मुंबई)10. डॉ.जय जाधव (संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मंबई ते सह आयुक्त, नवी मुंबई - सध्याचे आयजी श्रेणीमध्ये पद उपमहानिरीक्षक श्रेणीमध्ये अवनत करून)

11. निसार तांबोळी (पोलिस उपमहानिरीक्षक व दक्षता अधिकारी, सिडको ते विशेष महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र - सध्याचे पद महानिरीक्षक श्रेणीमध्ये अवनत करून)12. चंद्र किशोर मिना (सदादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. 8, मुंबई ते विशेष महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, सध्याचे पद अवनत करून) 

13. संजय दराडे (पोलिस उपमहानिरीक्षक, दक्षता अधिकारी, विक्रीकर विभाग, मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व विभाग, पोलिस आयुक्तालय, मुंबई शहर)14. संगणकल विरेश प्रभु (अप्पर आयुक्त, मध्य विभाग, मुंबई शहर ते अप्पर आयुक्त, गुन्हे, मुंबई)15. सत्य नारायण (पोलिस उपमहानिरीक्षक, व्हीआयपी, सिक्युरिटी, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते अप्पर आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई शहर)16. ज्ञानेश्वर चव्हाण (अप्पर आयुक्त, (संरक्षण व सुरक्षा), मुंबई शहर ते अप्पर आयुक्त, मध्य विभाग, मुंबई शहर)17. नामदेव चव्हाण (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना ते अप्पर आयुक्त, उत्तर विभाग, पुणे - पदोन्नतीने)18. आरती सिंह (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण ते पोलिस आयुक्त, अमरावती शहर - पदोन्नतीने) 19. संदीप कर्णिक (अप्पर आयुक्त, गुन्हे, मुंबई शहर ते अप्पर आयुक्त, पश्चिम विभाग, मुंबई शहर)20. एस. एच. महावरकर (अप्पर आयुक्त, उत्तर विभाग, नागपूर शहर ते पोलिस उपमहानिरीक्षक व दक्षता अधिकारी, सिडको)21. लक्ष्मी गौतम (अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व विभाग ते महानिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई)

22. एस. जयकुमार (अप्पर आयुक्त, सशस्त्र पोलिस बल, मुंबई शहर ते अप्पर आयुक्त, मिरा भाईदर वसई विरार, पोलिस आयुक्तालय)23. संदीप बी. पाटील (पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण ते पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र नागपूर - पदोन्नतीने)24. विरेंद्र मिश्रा (पोलिस उपायुक्त, पुणे शहर ते अप्पर आयुक्त, सशस्त्र पोलिस बल, मुंबई शहर पदोन्नतीने)

 

25. प्रताप दिघावकर, (विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंध, पोलीस महासंचालक, मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक)

 

देवेन भरती यांची एटीएसमधून उचलबांगडी

एटीएसचे प्रमुख देवेन भारती यांना तेथून हलविण्यात आले असून त्यांना तूर्तास कोणतेही पद देण्यात आलेले नाही. माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी असे त्यांना समजले जात होते,  तसेच माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्याच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. या दोन्ही बाबी त्यांना भोवल्याचे सांगण्यात येते.  

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीMaharashtraमहाराष्ट्रHome Ministryगृह मंत्रालयcommissionerआयुक्त