आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 07:00 IST2025-10-02T06:59:52+5:302025-10-02T07:00:16+5:30
राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्यभरात ठिकठिकाणी दसरा मेळावे होत असून कोणत्या विचारांचे सोने लुटले जाणार, याबाबत उत्सुकता आहे.

आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
मुंबई : राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्यभरात ठिकठिकाणी दसरा मेळावे होत असून कोणत्या विचारांचे सोने लुटले जाणार, याबाबत उत्सुकता आहे.
> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभरावा ऐतिहासिक विजयादशमी उत्सव नागपुरात रेशीमबाग मैदानावर सकाळी ७:४० वाजता होत असून त्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत.
> डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर सायंकाळी ६ वाजता ६९व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य समारंभ होणार आहे. भदंत चंद्रिमा थेरो, भंते विनयाचार्य, डॉ. राज शेखर वृंड्रू हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार.
> ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का याकडे असेल लक्ष.
कुठे हाेणार? : शिवाजी पार्क, मुंबई
किती वाजता? : सायंकाळी ५ वाजता
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन.
कुठे हाेणार? : नेस्को सेंटर, गोरेगाव
किती वाजता? : सायंकाळी ६ वाजता
बंजारा समाज दसरा मेळावा
पोहरादेवी (जि. वाशिम) येथे होणार. आरक्षण आंदोलनाची दिशा ठरविणार.
पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा
राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगाव घाट (जि. बीड) येथे होणार.