शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

मी जबाबदार... माझा मास्क, माझी जबाबदारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेअर केले व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 4:55 PM

Me Jababdar, Maza Mask, Mazi Jababdari Maharashtra CM Uddhav Thackeray launch new campaign : उद्धव ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले व्हिडीओ

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले व्हिडीओव्हिडीओंद्वारे नागरिकांना सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पहिल्यांदाच राज्यात सर्वाधिक म्हणजेच ३१ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली होती. तर दुसरीकडे केवळ मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. मंगळवारी राज्यात २८ हजार ६९९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर सोमवारी राज्यात २४ हजार ६४५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी या पार्श्वभूमीवर निर्बंधही अधिक कडक करण्यात आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी गुरूवारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. Me Jababdar, Maza Mask, Mazi Jababdari Maharashtra CM Uddhav Thackeray launch new campaign'मी जबाबदार... माझा मास्क, माझी जबाबदारी' अशा मथळ्याखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. तसंच मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचंही आवाहन करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात एक कॅम्पेन सुरू केल्याचं दिसत आहे. याद्वारे कायम हात स्वच्छ करत राहणं, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क परिधान करणं आवश्यक असल्याचा संदेश देण्यात आला आहे.कोरोना महासाथीपासून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात रुग्णवाढकोरोनानं मुंबईतही पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. बुधवारी चोवीस तासांमध्ये मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. कोरोना महासाथीपासूनची ही सर्वात मोठी रुग्णवाढ होती. दरम्यान, ही सर्वाधिक रुग्णवाढ असून कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे. सध्या मुंबई एकून साडेतीस हजारांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह केसेस असून रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के इतका आहे. सध्या राज्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ८४ दिवस असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीSocial Mediaसोशल मीडियाcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई