शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
13
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
14
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
15
‘डोंट यू अंडरस्टँड? गेट आउट फ्रॉम हिअर!’ रस्ता मोकळा करा! ‘जेन-झी’ने हातात घेतलेले नवे शस्त्र
16
‘अमेरिकन ड्रीम’चा पोपट मेला असे म्हणायचे का?; भारताला बसणार सर्वाधिक फटका, कारण...
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर कारागृह अधिका-यांना लागणार मोक्का

By admin | Updated: April 9, 2015 01:36 IST

नागपूर मध्यवर्ती कारागृहात मोबाईलचा स्वैर वापर म्हणजे ‘आॅर्गनाईज क्राईम सिंडिकेटला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणे होय’,

राहुल अवसरे, नागपूरनागपूर मध्यवर्ती कारागृहात मोबाईलचा स्वैर वापर म्हणजे ‘आॅर्गनाईज क्राईम सिंडिकेटला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणे होय’, असा निष्कर्ष काढून कारागृहातील दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यावर शहर पोलीस कायदे तज्ज्ञांसोबत विचारविमर्श करीत असल्याचे उच्च पदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आले.कारागृहातून ३१ मार्चच्या पहाटे पाच कैदी पळून गेले. पलायनाच्या घटनेनंतर कारागृहात धाडसत्र सुरू होऊन ६० हून अधिक मोबाईल जप्त करण्यात आले. यावरून कारागृहात मोबाईलचा किती स्वैर वापर सुरू होता, हे स्पष्ट होते. यापूर्वीही कारागृहातून मोक्काच्या आरोपींकडून संबंधितांना मोबाईलने संपर्क करून खंडणी मागण्याचे चार गुन्हे नोंदले गेले. पीडितांनी संबंधित तक्रार केल्यामुळे हे गुन्हे उजेडात आले. दुर्दैवाने या गुन्ह्यांचा अद्यापही संबंधित मोक्का आरोपीच्या प्रकरणात समावेश करण्यात आला नाही. येथील अधिकारी किंवा सुरक्षा कर्मचारी आर्थिक मोबदला घेऊनच मोबाईल गुन्हेगारांपर्यंत पोहोचवतात, असे ‘मोक्का’मध्ये गृहितच धरले जाते. अधिकारी किंवा कर्मचारी उघडपणे मोबाईलच्या माध्यमातून आॅर्गनाईज क्राईम सिंडिकेटला मदत करीत असल्याने ते महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या कलम २४ अन्वये गुन्हा करीत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या सर्वांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.