शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांचा ताफा माघारी फिरलेला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 3:14 PM

Raj Thackeray Ralley For Narayan Rane: इतिहासाच्या पानांवर या घटना नोंद, राज ठाकरे- नारायण राणे घनिष्ट मैत्री तरी देखील राज यांना माघारी फिरावे लागले होते. ४ मेच्या सभेचे लोकेशन एवढे महत्वाचे की...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि रत्नागिरी-सिंधुदूर्गचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांची मैत्री सर्वांनाच माहिती आहे. दोघेही एकेकाळी शिवसेनेत होते. राज ठाकरेंमुळेच मी वाचलो आणि रातोरात शिवसेनेतून बाहेर पडलो, असे खळबळजनक वक्तव्य राणे यांनी केले होते. याच राज ठाकरेंना तेव्हा सिंधुदूर्गात राणे समर्थकांच्या तीव्र विरोधामुळे ताफा घेऊन माघारी फिरावे लागले होते. इतिहासाच्या पानांवर या घटना नोंद आहेत, असे असताना राज ठाकरे नारायण राणेंसाठी कणकवलीत येत आहेत. 

राज ठाकरेंची कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालया समोरच्या खुल्या पटांगणावर सभा होण्याची शक्यता आहे. ४ मे रोजी राज ठाकरे कणकवलीला येत आहेत. राज यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात राज यांची सभा व्हावी यासाठी शिवसेना आणि भाजपा आग्रही आहेत. मनसेचा प्रभाव असलेल्या जागांवर राज यांच्या सभा आयोजित करण्यात येणार आहेत. अद्याप याचे टाईम टेबल ठरलेले नसले तरी ४ मे रोजी राज कणकवलीच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते आहे. 

सभेचे ठिकाण अत्यंत मोक्याचे निवडण्यात आले आहे. या ठिकाणापासून राणेंचा जय गणेश बंगला एक ते दीड किमी अंतरावर तर वैभव नाईक यांचा बंगला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. रत्नागिरीमध्ये मनसेचा मेळावा पार पडला होता. यामध्ये नारायण राणे, उदय सामंत यांनी या मेळाव्याला राज ठाकरे नसल्याची खंत व्यक्त केली होती. यानंतर सर्व सुत्रे हलली आहेत. 

राज ठाकरेंचा ताफा का माघारी फिरला होता? काय होता तो किस्सा...नारायण राणे बाहेर पडले तेव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते. पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधी वातावरण तयार झाले होते. ठाकरेंनी सर्व आमदार, खासदार सिंदुदूर्गमध्ये धाडले होते. त्यांच्यासोबत फिरायला कोणी नव्हते अशी केविलवाणी अवस्था तेव्हा शिवसेनेची झाली होती. याच काळात राज ठाकरे देखील सिंधुदूर्गच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी राणे समर्थकांनी राज यांचा ताफा अडविला होता. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या संदेश पारकर आणि समर्थकांनी राज यांना माघारी फिरण्याची विनंती केली होती. पुन्हा याल तेव्हा आम्ही तुमचे स्वागत करू, असे राष्ट्रवादीने आश्वासन दिले होते. वातावरण पाहून राज यांनी आपला ताफा माघारी वळविला होता. यानंतर काही वर्षांनी पुन्हा राज हे दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचे बोलल्याप्रमाणे स्वागत केले होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarayan Raneनारायण राणे ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४MNSमनसे