Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 07:29 IST2025-06-16T07:27:38+5:302025-06-16T07:29:10+5:30

Matheran drown News: नवी मुंबईतून माथेरानला पर्यटनासाठी आलेल्या १० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी तिघे जण रविवारी संध्याकाळी शार्लोट लेक तलावात बुडाले.

Matheran: 3 teens out for a swim in Matheran lake drown | Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या

Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या

नवी मुंबईतून माथेरानला पर्यटनासाठी आलेल्या १० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी तिघे जण रविवारी संध्याकाळी शार्लोट लेक तलावात बुडाले. सह्याद्री आपत्कालीन बचाव पथकासह खोपोलीचे एक पथकही रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेत होते. सुमित चव्हाण (वय १६), आर्यन खोब्रागडे (वय १९) आणि फिरोज शेख (वय १९) अशी त्यांची नावे आहेत.

कोपरखैरणेतील महाविद्यालयीन तरुणाचा हा चमू माथेरानला पावसाळी पर्यटनासाठी आला होता. पिसरनाथ मंदिरात दर्शन घेऊन ते जवळच्या शार्लोट लेकवर गेले. तेथे तलावाच्या काठावर मौजमजा करता करता त्यांच्यापैकी एक तरुण पाय घसरून तलावात पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी काहींनी तलावात उड्या घेतल्या. त्यापैकी दोघांनी बुडणाऱ्या तरुणाचा हात पकडला. मात्र त्याच्याबरोबर तेही बुडाले. 

रात्री उशिरापर्यंत बचाव पथकांकडून शोध सुरू 
इतरांनी या घटनेची माहिती स्थानिकांना दिली. त्यानंतर माथेरान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी माथेरान सह्याद्री आपत्कालीन रेस्क्यू टीमला मदतीसाठी बोलावले.  बचाव पथक बुडालेल्या तरुणांचा  रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. त्यांच्या मदतीला खोपोली येथील अपघातग्रस्त सामाजिक संस्था गुरूनाथ साठलेकर यांच्या पथकालाही पोलिसांनी मदतीसाठी पाचारण केले होते.

Web Title: Matheran: 3 teens out for a swim in Matheran lake drown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.