शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मातंग समाज विविध मागण्यांसाठी उभारणार राज्यभर लढा; समाजातील सर्व पक्षीय नेत्यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 18:29 IST

मागण्या मान्य न झाल्यास कोरोना महामारीनंतर रस्त्यावर लाखोंच्या संख्येने उतरण्याचा निर्णय

ठळक मुद्देराज्यातील ३० विविध मातंग समाज पक्ष, संघटना प्रमुख यांची मंगळवारी पुण्यात बैठक

पुणे : राज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात मातंग समाज लोकसंख्येने जास्त असूनही दुर्लक्षित राहिला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाजातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन, राज्यभर लढा उभारून एल्गार पुकारण्याचा निर्धार केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास कोरोना महामारीनंतर रस्त्यावर लाखोंच्या संख्येने उतरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.         राज्यातील ३० विविध मातंग समाज पक्ष, संघटना प्रमुख यांची बैठक मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेद्वारे "मातंग स्पिक अभियान" ची घोषणा बैठकीचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केली. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, मछिन्द्र सकटे, हनुमंत साठे, प्रा.मिलिंद आव्हाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.     हे वर्ष अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा ही अभियानाची मुख्य मागणी असल्याचे बागवे यांनी सांगितले.         बार्टीच्या धर्तीवर आर्टी सुरू करून समाजाचा विकास करावा, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य असावा, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कामकाज पुन्हा सुरू करावे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक तात्काळ करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आली. या मागण्यांसाठी राज्यभर सर्व समाज व समाजाच्या नेत्यांचे ऐक्य घडवून आणून, जनजागृती करण्यात येणार असल्याचे बागवे यांनी सांगितले.------

टॅग्स :PuneपुणेagitationआंदोलनPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार