शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातील चढउतार

By admin | Updated: July 11, 2014 01:40 IST

गुंतवणुकदारांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर आलेल्या तेजीचा फायदा घेत नफा कमविण्यासाठी विक्रीचा धडाका लावल्याने दिवसअखेर निर्देशांक घटलेला दिसून आला.

अच्छे दिनची अपेक्षा बाळगून असलेल्या गुंतवणुकदारांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर आलेल्या तेजीचा फायदा घेत नफा कमविण्यासाठी विक्रीचा धडाका लावल्याने दिवसअखेर निर्देशांक घटलेला दिसून आला. 
 
वर्षभरात जीएसटीवर निर्णय
नवी दिल्ली : वस्तू व सेवाकर (जीएसटी) लवकरात लवकर लागू करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अप्रत्यक्ष करप्रणालीबद्दलच्या सर्व मुद्दय़ांवर चालू आर्थिक वर्षात तोडगा काढण्यात येईल आणि जीएसटीबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. या वर्षअखेर जीएसटी आवश्यक कायदा लागू करण्यात येईल. यामुळे प्रशासनाला तर्कसंगत करण्यात मदत होईल आणि केंद्र व राज्य पातळीवरील गंगाजळीत वाढ होईल, असेही ते म्हणाले. जीएसटी लागू झाल्यानंतर केंद्र अणि राज्य पातळीवरील बहुतांश अप्रत्यक्ष कर समाप्त होतील. आधीच्या संपुआ सरकारने 2क्11 मध्ये जीएसटी लागू करण्यासाठी लोकसभेत घटनादुरुस्ती विधेयक मांडले होते. 
 
..अन् अर्थसंकल्पीय 
भाषण थांबवावे लागले
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय भाषण करीत असताना अर्थमंत्री अरुण जेटली यांना पाठदुखीचा त्रस जाणवू लागल्याने भाषण थांबवून विश्रंती घेतली. पाच मिनिटांनंतर पुन्हा भाषणाला सुरुवात झाली.  जेटली यांना 45 मिनिटांच्या भाषणानंतर पाठदुखीचा त्रस जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी पाच मिनिटांचा ‘ब्रेक’ देण्याची विनंती लोकसभा अध्यक्ष सुमित्र महाजन यांच्याकडे केली. महाजन यांनी 11.45 वाजताच्या सुमारास कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले. संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अध्यक्षांनी जेटली यांना बसून अर्थसंकल्पीय भाषण करण्याची परवानगी दिली. जेटली यांनी बसूनच उर्वरित भाषण आटोपले. देशाच्या इतिहासात अर्थसंकल्पीय भाषण काही काळासाठी थांबवण्यात आल्याची ही पहिलीच घटना होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय मंत्री उमा भारती, वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक नेत्यांनी जेटलींजवळ जाऊन विचारपूस केली. 
 
ब्रॉडबॅण्ड सेवा खेडय़ापाडय़ात नेण्यासाठी ‘डिजिटल इंडिया’ 
नवी दिल्ली : ग्रामीण भागात ‘डिजिटल इंडिया’ हा उपक्रम राबविण्याबरोबरच शेतक:यांसाठी तसेच ईशान्येकडील राज्यांसाठी स्वतंत्र नवी टीव्ही चॅनेल सुरू करण्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी केली. महिती तंत्रज्ञान क्षेत्रतील क्रांतिकारक विकासाची फळे खेडय़ापाडय़ातील लोकांनाही चाखता यावीत, यासाठी संपूर्ण भारतव्यापी असा ‘डिजिटल इंडिया’ नावाच्या उपक्रमाची घोषणा जेटली यांनी केली. तसेच सरकारी सेवा खेडय़ांमध्ये आणि शाळांमध्ये पुरविण्यासाठी तसेच आयटीविषयक कौशल्य विकासासाठी नॅशनल रुरल इंटरनेट अॅण्ड टेक्नॉलॉजी मिशन हाती घेण्यात येणार आहे. 
 
लोकसभेत अर्थसंकल्प मांडला जाणार असल्यामुळे बाजार बुधवारच्या  बंद निर्देशांकापेक्षा 31 अंशाने वाढून बाजार उघडला. 
 
अर्थमंत्र्यांचे भाषण चालू असताना प्रथम बाजार खाली आला, मात्र करप्रस्तावांचे वाचन सुरू झाले आणि बाजाराला पुन्हा एकदा तेजीचे भरते आले.
 
दुपारी दोन वाजेनंतर बाजारात नफा कमविण्यासाठी विक्री झाली. त्यामुळे बाजार सातत्याने खाली येत अखेरीस 
लाल रंगात तो बंद झाला.