शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

लष्कराच्या ताफ्यात 'मार्क ३' हेलिकॉप्टर दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 7:19 PM

अतिउंचावरील ठिकाणे तसेच प्रतिकूल वातावरणातही हे हेलिकॉप्टर उडण्यास सक्षम असून लष्कराच्या तुकड्या, शास्त्र तसेच अनेक मदत तसेच बचाव मोहिमेट हे हेलिकॉप्टर फायदेशीर ठरणार आहे.

ठळक मुद्देहिंदुस्थान एरॉनॉटिल ने केले विकसित : मारक क्षमतेत होणार वाढ मार्क ४ रुद्र हेलिकॉप्टर च्या निर्मितीचे कार्य सुरु असून ते ही लवकरच सैन्य दलात दाखल होणारआधुनिक हॅलिकॉप्टर निर्मितीची क्षमता असलेला भारत जगातील सहावा देश हेलिकॉप्टर बांधणी साठी नवा प्रकल्प कर्नाटक राज्यातील तुमाकुर जिल्ह्यात

निनाद देशमुख बेगळुरू : भारतीय लष्कराची ताकद आता आणखी वाढणार आहे. हिंदूस्तान एरोनॉटिकल लिमिटेड द्वारे बनविण्यात आलेल्या ध्रुव श्रुंखला मधील आधुनिक मार्क ३ हेलिकॉप्टर शुक्रवारी लष्कराला सुपूर्द करण्यात आले. अतिउंचावरील ठिकाणे तसेच प्रतिकूल वातावरणातही हे हेलिकॉप्टर उडण्यास सक्षम असून लष्कराच्या तुकड्या, शास्त्र तसेच अनेक मदत तसेच बचाव मोहिमेट हे हेलिकॉप्टर फायदेशीर ठरणार आहे. या बरोबरच याच शृंखलेतील ध्रुव मार्क ४ रुद्र  हेलिकॉप्टर च्या निर्मितीचे कार्य सुरु असून ते ही लवकरच सैन्य दलात दाखल होणार आहे. सैन्य दलाकडून अ‍ॅडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरची मागणी हिंदुस्थान एरोनॉटिकलकडे करण्यात आली होती. त्या नुसार नव्या पिढीतील हे हेलिकॉप्टर बनविण्यात आले आहे. हिंदूस्तान एरोनॉटिकल लिमिटेडचे प्रमुख ए. आर. माधवन यांच्या हस्ते आर्मी एव्हिएशन विभागाचे प्रमुख लेफ़्टनंट जनरल कनवाल कुमार याना बंगरुळु येथे सुरु असलेल्या एअरो इंडिया २०१९ या प्रदर्शनात या संदभार्तील कागदपत्रे सुपूर्द करण्यात आले. यावेळी एचएएलचे हेलिकॉप्टर डिव्हिजन चे प्रमुख  एच. व्ही. एस. भास्कर  तसेच लष्कराचे, एचएएल, डीजीक्यूएए आणि आरसीएमएचे अधिकारी उपस्थित होते. करारानुसार पिहले ३ हेलिकॉप्टर सुपूर्द करण्यात आले आहेत. एचएएलने आॅगस्ट २०१७ मध्ये ४० एएलएच (अ‍ॅडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर) बांधणीचा करार केला होता.  यानुसार २२ एएलएच एमके ३ आणि इतर १८ एएलएच एमके   ४ रुद्र हेलिकॉप्टर तयार करून दिली जाणार आहे. यातील २२ हेलिकॉप्टरपैकी १९ हेलिकॉप्टर आधीच तयार करण्यात आल्या आहेत आणि ती लवकरच लष्कराला दिली जाणार आहे.   एएलएच मार्क ३ ध्रुव हे हेलिकॉप्टर नव्या पिढीतील  अत्याधुनिक हेलिकॉप्टर  आहे. यात वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे हे विमान बहुआयामी ठरले आहे. याचे वजन ५.५ टन असनून याचे सर्व तंत्रध्यान हे भारतीय असून एचएएल द्वारे ते  विकसित करण्यआत आले  आहे. या हेलिकॉप्टर मध्ये  दोन शक्ती इंजिन बसवण्यात आले असून यामुळे  अनेक अवजड वस्तू वाहून नेण्याची क्षमता यात आहे. या इंजिनामुले सर्वाधिक उंचीवर अतिशय कुशलतेने हे हेलिकॉप्टर उडवता येऊ शकते.  प्रतिकूल परिस्थितीतही हव्या त्या टीकानि  सैन्यानं रसद पोहचविण्यात हे हिकॉप्टर सक्षम आहे. या संदर्भात लोकमतशी बोलताना एचएएलचे   हेलिकॉप्टर डिव्हिजन चे प्रमुख  एच. व्ही. एस. भास्कर म्हणाले, एच ए एलला १५९ हेलिकॉप्टर बनविण्याचे कंत्राट मिळाले आहे. यातील १०५ हेलिकॉप्टर हे आर्मीसाठी, तर ५४ हेलिकॉप्टर हे एअर फोर्स साठी बनविण्यात येत आहेत. यातील काही हेलिकॉप्टर हे मार्क ३ तर काही हेलिकॉप्टर हे मार्क 4 प्रकारातील आहेत.यासोबातच नौदल आणि तटरक्षक दलानेही आमच्या कडे प्रत्येकी १६ हेलिकॉप्टर बनविण्याचे कंत्राट दिले आहे. त्यांची बांधणी ही सुरू आहे.......................हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिडेड आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला असून त्यानुसार हेलिकॉप्टर बांधणी साठी नवा प्रकल्प कर्नाटक राज्यातील तुमाकुर जिल्ह्यातील ग्रीन फिल्ड फॅक्टरी मध्ये उभारण्यात येत आहे. 615 एकर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून यात 3 टनापासून तर 13 टन वाजनापर्यंत च्या हेलिकॉप्टरची निर्मिती केली जाणार आहे. ................हॅलिकॉप्टर निर्मितीची क्षमता असलेला भारत जगातील सहावा देश आधुनिक पिढीतील हेलिकॉप्टर निर्मितीची क्षमता असलेला भारत हा जगातील 6 देश आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इस्राईल, चीन या देशांकडे हेलिकॉप्टर उभारणीची क्षमता आहे. भारताने आतापर्यंत नेपाळ, इंडोनेशिया, श्रीलंका या देशांना आतापर्यंत हेलिकॉप्टर निर्यात केले आहे.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानairforceहवाईदल