शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा अजूनही तहानलेला : राज्याच्या १७ जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 15:44 IST

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी तब्बल ६ जिल्ह्यांमध्ये पाऊस अतिशय कमी झाला असून हिंगोलीमध्ये तर सरासरीपेक्षा ५८ टक्के पाऊस कमी झाला आहे़. 

ठळक मुद्दे३० टक्के कमी पाऊस मुंबई उपनगर, पालघरमध्ये सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पावसाची नोंद - मराठवाडा अजूनही तहानलेला

पुणे : संपूर्ण जून महिन्यात वाट पाहायला लावणाऱ्या मॉन्सूनने अखेरच्या चार दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली़. कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपून काढले आहे़. मुंबई उपनगर, पालघरमध्ये सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पावसाची नोंद झाली असतानाच मराठवाडा अजूनही तहानलेला आहे़. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी तब्बल ६ जिल्ह्यांमध्ये पाऊस अतिशय कमी झाला असून हिंगोलीमध्ये तर सरासरीपेक्षा ५८ टक्के पाऊस कमी झाला आहे़. ‘वायु’चक्रीवादळामुळे जूनमधील मॉन्सूनचे आगमन लांबले़ पावसाळ्याच्या सुरुवातीला अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस होतो़. पण, ‘वायु’ वादळामुळे हे सर्व बाष्प शोषले जाऊन सर्व पाऊस समुद्रात पडला़. त्यामुळे सर्व महाराष्ट्रात काळजीचे वातावरण निर्माण झाले होते़. पण जुनच्या अखेरच्या आठवड्यात मॉन्सूनची वाटचाल सुरु झाल्यानंतर राज्यात पाऊस परतला़. कोकण, उत्तर कोकणात त्याने कहर केला़. मात्र, घाटावरुन तो पुढे फारसा सरकला नाही़. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील सर्व धरणातील पाणीसाठ्यात अजूनही फारशी मोठी वाढ झाली नाही़ मॉन्सून कमकुवत असल्याचा सर्वाधिक फटका मराठवाड्याचा बसला आहे़. मुंबई व कोकण परिसरात मुसळधार पाऊस झाला़. मुंबईची तुंबई झाल्याची वर्णने ऐकल्याने राज्यात पाऊस झाला असल्याचा गैरसमज शहरी भागातील लोकांचा होण्याचा संभव आहे़. मात्र, तसे नाही़ प्रत्यक्षात काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अजून जोरदार पावसाची आवश्यकता आहे़. मध्य महाराष्ट्रात अजूनही सरासरीपेक्षा १२ टक्के आणि विदर्भात सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस झाला आहे़. मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक प्रमाणात पावसाची कमी आहे़. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात कमी पाऊस झाला असून तेथे सरासरीच्या केवळ ३५ टक्के पाऊस झाला आहे़. मध्य महाराष्ट्रात १६० मिमी पाऊस आतापर्यंत पडला आहे़ प्रत्यक्षात मध्य महाराष्ट्रात आतापर्यंत १८१़२ मिमी इतकी सरासरी आहे़. सरासरीपेक्षा १२ टक्के कमी पाऊस झाला आहे़. विदर्भातील ११ जिल्ह्यापैकी ७ जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस पडला आहे़. विदर्भात आतापर्यंतची पावसाची सरासरी १९६.२ मिमी असते़. पण प्रत्यक्षात १४७़.६ मिमी पाऊस झाला असून तो २५ टक्के कमी आहे.मराठवाड्यात विभागात १ जून ते ३ जुलैदरम्यान१५५.१मिमी सरासरी पाऊस पडतो़. मात्र, आतापर्यंत केवळ १०८.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. मराठवाड्यात सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस कमी झाला आहे़. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने विदर्भात सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता़. त्यामुळे तेथे सरासरीपर्यंत पावसाची शक्यता आहे़. मात्र, मराठवाड्यात जोरदार पावसासाठी आता पुन्हा मॉन्सूनचा जोर वाढल्यानंतर पाऊस होईल़. तोपर्यंत वाढ पहावी लागेल़.

 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा