शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

वंचित आघाडीने बदलले मराठवाड्याचे राजकारण

By सुधीर महाजन | Published: May 25, 2019 5:35 AM

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय प्रयोगाने राजकारणाचा ताळेबंदच बाद ठरवला.

ठळक मुद्दे नरेंद्र मोदी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहून मतदान झाले.राजकारणात ‘वंचित’चे महत्त्व वाढणार

-सुधीर महाजन

मराठवाड्यातील निकालांचे वैशिष्ट्य म्हणजे अशोक चव्हाण आणि चंद्रकांत खैरे या दोन दिग्गजांचा पराभव. तसेच पहिल्यांदाच मराठवाड्यातून काँग्रेसचा एकही खासदार नाही. मोदी लाटेत नांदेडची जागा काँग्रेसने गमावणे आश्चर्य नाही; पण औरंगाबादसारखी शिवसेनेची महत्त्वाची जागा एमआयएमने हिसकावणे ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे. हा पराभव सेनेच्या जिव्हारी लागणारा आहे. कारण मुंबईबाहेर शिवसेनेच्या राजकारणाची मुहूर्तमेढ औरंगाबादेतच रोवली गेली होती.

गेल्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही नांदेडची जागा काँग्रेसने राखली होती; परंतु यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय प्रयोगाने काँग्रेसच्या राजकारणाचा ताळेबंदच बाद ठरवला. त्याचा फायदा भाजपने उठवला. हे चित्र महाराष्ट्रभर दिसले. धर्मनिरपेक्ष मतांच्या विभाजनाचा फटका काँग्रेसला बसला. अशोक चव्हाणांचा पराभव झाला असला तरी त्यांना साडेचार लाख मते मिळाली. या गोष्टीकडे कानाडोळा करता येणार नाही. यावेळी पहिल्यांदाच भाजप आणि वंचित आघाडी या दोन्ही पक्षांना मिळालेली मते ही पक्षाकडे न पाहता नरेंद्र मोदी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहून मतदान झाले. या ठिकाणी पक्षाचा उमेदवार दुय्यम ठरला. गेल्या निवडणुकीत ‘अशोकराव पाहिजेत’ या मुद्यावर मतदान झाले होते. यावेळी हा मुद्या गायब होता. ‘वंचित’च्या उदयामुळे काँग्रेसच्या परंपरागत मतदाराचे विभाजन ही बाब निर्णायक ठरली.

नांदेडमध्ये पाटील, देशमुख वाद ऐन निवडणुकीत उफाळून आला. त्याचाही फटका बसला. नांदेडमधील काँग्रेस व भाजपला मिळणाऱ्या मतांचा १९९७ पासून आढावा घेतला तर ही मते सारखीच आहेत. २००४ साली काँग्रेसच्या मतांच्या विभाजनामुळे भास्करराव पाटील खतगावकर पराभूत झाले होते, त्याची पुनरावृत्ती यावेळी झाली. पाच टक्के नवामतदार भाजपकडे झुकला.

औरंगाबादेत खैरेंचा पराभव अपेक्षाभंग करणारा अजिबात नव्हता. जनतेला गृहीत धरण्याची प्रवृत्ती हे पराभवाचे मूळ कारण आहे. गेल्या वर्षभरात कचरा, पाणी, रस्ते या समस्यांनी औरंगाबादचे नागरिक त्रस्त आहेत आणि या समस्यांवर अजुनही उपाय योजले नाहीत. शिवाय महानगरपालिकेतील अनागोंदी या सगळ्यांचा फटका खैरेंना बसला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आळसावलेली शिवसेना. त्याचा परिणाम झालाच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंच्या मतांचे विभाजन झाले. एम.आय.एम.चे इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेतून विधानसभेची निवडणूक जिंकली होती. त्यांच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातच शिवसेनेचा बालेकिल्ला समजली जाणारी गुलमंडी येथे. तेथेच त्यांनी सेनेचा पराभव केला; पण या पराभवातून सेनेने धडा घेतला नाही.

‘वंचित’चे महत्त्व वाढणारमराठवाड्यात उर्वरीत जागांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले. हिंगोलीत गेल्या वेळेस काँग्रेसचे राजीव सातव निसटत्या बहुमताने विजयी झाले होते आणि आता ते उमेदवारही नव्हते. त्यामुळे हिंगोली काँग्रेसने गमावली. रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे जिंकणार हे अधोरेखीत होतेच. उस्मानाबादेत सेनेने उमेदवार बदलला त्याचा फायदा झाला. बहुजन वंचित आघाडीने मराठवाड्यातील राजकारणाचे समीकरण बदलून टाकले, याची झलक मोदी त्सुनामीतही पहायला मिळाली; पण आता आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे महत्त्व आणखी निश्चितच वाढणार.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMarathwadaमराठवाडाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९