शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Marathwada: मराठवाड्याला मेगा बूस्टर, छत्रपती संभाजीनगरच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णयांचा वर्षाव

By यदू जोशी | Updated: September 13, 2023 09:12 IST

Maharashtra Government: राज्य मंत्रिमंडळाची बैठक येत्या १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार असून तीत हजारो कोटी रुपयांचे पॅकेज मराठवाड्याच्या विकासासाठी देण्यात येणार आहे.

- यदु जोशीमुंबई - राज्य मंत्रिमंडळाची बैठक येत्या १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार असून तीत हजारो कोटी रुपयांचे पॅकेज मराठवाड्याच्या विकासासाठी देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ निर्णयांव्यतिरिक्त वेगळ्या घोषणाही मुख्यमंत्री शिंदे करतील. त्या दृष्टीने मंत्रालयात हालचाली सुरू आहेत. 

राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी सर्व विभागांच्या सचिवांना गेल्या आठवड्यात पत्र पाठवून मराठवाड्याच्या प्रगतीसाठी कुठले निर्णय व्हायला हवेत, यासाठीचे प्रस्ताव मागविले होते. २० विभागांकडून अडीचशेहून अधिक प्रस्ताव आले आहेत. वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात झालेल्या मंत्री पातळीवरील बैठकीत याविषयी चर्चा झाली. या बैठकीला धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, अतुल सावे, संजय बनसोडे हे मंत्री उपस्थित होते.  निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कार्यक्रमही जाहीर करण्याचे बैठकीत ठरले. 

बैठकीसाठी भरगच्च विषय मंत्रिमंडळ बैठकीत किमान ३० निर्णय मराठवाड्यासाठी होतील, असे सूत्रांनी सांगितले. त्यात कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, कौशल्य विकास आणि सिंचन क्षेत्रासंबंधी महत्त्वाचे निर्णय होतील. सध्या जेवढ्या विषयांची छाननी करण्यात आली आहे ते १६ हजार ४०० कोटी रुपये खर्चाचे आहेत. याशिवाय मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पत्र परिषदेत घोषणा करण्याची अपेक्षा आहे, ते विषय १६ हजार ७८० कोटी खर्चाचे आहेत. अर्थात दोन्हींबाबत आणखी छाननी केली जाईल आणि नंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या मान्यतेनंतर अंतिम स्वरुप दिले जाईल.

सिंचनाची नवीन योजना मराठवाड्यासाठी सिंचनाची नवीन योजना जाहीर केली जाईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल, पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कायापालट, मराठवाडा मुक्ती संग्रामात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महनीय व्यक्तींचे त्यांच्या गावी स्मारक, तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराचा विकास, मराठवाड्यातील जलसंपदा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता, नवीन न्यायालये, नांदेडमध्ये शासकीय कृषी महाविद्यालयाची उभारणी, ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांसह महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा विकास, रस्ते विकास, आरोग्य सुविधांची निर्मिती आदींबाबत निर्णयाची शक्यता आहे.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMarathwadaमराठवाडा