शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळांमधल्या मराठीची चिंता जिल्हाधिकारी असताना केली का? शिक्षणमंत्र्यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 07:00 IST

 ‘‘जिल्हाधिकारी असताना लक्ष्मीकांत देशमुख यांनी यातला एकही निर्णय राबविला नव्हता. मग आता हे एकदम का सुरू झाले आहे?

ठळक मुद्देअनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी विषय बंधनकारक

नम्रता फडणीसपुणे : ‘‘ माजी संंमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख जिल्हाधिकारी होते त्यावेळी त्यांनी इंग्रजी शाळांमध्येमराठी शिकविले जात होते की नव्हते, हे पाहिले होते का?,’’ असा सवाल राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. मराठी संदर्भात गेल्या पावणेपाच वर्षात ज्या गोष्टी झाल्या, त्यापूर्वी कधीच झाल्या नव्हत्या. देशमुख आणि डॉ. श्रीपाद जोशी यांना त्या दिसत नाही का, असाही प्रश्न तावडे यांनी उपस्थित केला आहे.      लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्यासह अनेक साहित्यिकांनी भाषा विकास प्राधिकरण कायदा करणार का? पाच हजार मराठी शाळा बंद करण्याचे लक्ष्य रद्द करणार का? मराठी माध्यमांच्या बंद पाडलेल्या शाळा पुन्हा सुरू करून त्यांचा दर्जा सुधारणार का?  शाळांचे खाजगीकरण होऊ देणार नाही असे म्हणणार का?  मराठी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी लेखी आश्वासित केलेली अशासकीय तज्ञांची उच्चाधिकार समिती केंव्हा नेमणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या संदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी  ‘लोकमत’ने संवाद साधला असता त्यांनी देशमुख आणि डॉ. जोशी यांच्यावरच तोफ डागली. ‘‘जिल्हाधिकारी असताना लक्ष्मीकांत देशमुख यांनी यातला एकही निर्णय राबविला नव्हता. मग आता हे एकदम का सुरू झाले आहे?  तिथे त्यांनी इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविले जात होते की नव्हते? हे पाहिले होते का? तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी काँग्रेसच्या काळात हे मुद्दे का काढले नाहीत,’’ असे तावडे म्हणाले. आज एसएससी बोर्डाच्या मराठी व इंग्रजी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी विषय बंधनकारक आहे. मात्र काही सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय दुस-या क्रमांकाची भाषा म्हणून शिकविला जातो किंवा पर्यायी भाषा म्हणून वापरण्यात येतो. त्यावर विनोद तावडे म्हणाले, की सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाच्या इंग्रजी शाळांमध्ये देखील आठवीपर्यंत मराठी विषय सक्तीचा आहे. त्याची जर अमंलबजावणी होत नसेल तर शाळांवर कडक कारवाई केली जाईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातील मागणीने साहित्यवर्तुळात जोर धरला आहे. त्यावर भाष्य करताना अभिजात भाषेच्या दर्जा मिळण्याबाबतची सगळी तयारी करून अहवाल केंद्रीय कँबिनेटला दिला आहे. लवकरच त्यासंबंधी काहीतरी निर्णय होईल अशी आशा तावडे यांनी व्यक्त केली. ..............भाषा प्राधिकरणाची गरज नाही    ‘‘आठवीनंतर शाळांमध्ये मराठी भाषा ठेवायची की जर्मन, रशियन, फ्रेंच भाषा विद्याथर््यांना द्यायच्या यावर विचार सुरू आहे. कारण मराठी मुलांचे जागतिक करिअर बंद करायचे की पुढे चालू ठेवायचे  याचा निर्णय शिक्षणतज्ञ बसून घेत आहेत. हा निर्णय राजकीय नसतो तर तो शिक्षण तज्ञांचा असतो. भाषा विकास प्राधिकरण कायदा वगैरे करण्याची गरज नाही. तर मराठी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सरकार अधिक मजबूत प्रयत्न करीत आहे. - विनोद तावडे,शिक्षणमंत्री 

टॅग्स :PuneपुणेLaxmikant Deshmukhलक्ष्मीकांत देशमुखVinod Tawdeविनोद तावडेmarathiमराठीEducationशिक्षणSchoolशाळा