शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईपासून मराठी माणसं तोडणार ही दरवेळचीच घीसीपीटी कॅसेट, एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:29 IST

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा शिंदेसेना आणि एकनाथ शिंदे ठाण्यापुरते आहेत असे म्हणायचे; पण..

बामणोली : ‘मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, हेच विरोधकांनी पाहिलं. तर आम्ही मुंबईचा विकास पाहतो. मुंबईपासून मराठी माणसं तोडणार ही दरवेळचीच घीसीपीटी कॅसेट आहे. आम्हाला महाराष्ट्र फास्ट तर मुंबई सुपरफास्ट करायची आहे. आम्ही बोलत नाही तर करून दाखवतो,’ अशा जोरदार टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.दरे, ता. महाबळेश्वर या आपल्या गावी आल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, ‘मुंबईचा सर्व विकास महायुती सरकारने केला. मुंबईची जनता सुज्ञ असून, कामाला महत्त्व देणारी आहे. भावनेचं राजकारण नको. लोकांना विकासाचा राजकारण पाहिजे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा शिंदेसेना आणि एकनाथ शिंदे ठाण्यापुरते आहेत असे म्हणायचे; पण आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी ते चांदा ते बांदापर्यंत आहेत, हे दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरे हे राज्यात फिरले नाहीत. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. म्हणून त्यांची परिस्थिती काय झाली ते आपण पाहिलंय. मला त्यांच्यावर बोलायचं नाही मी कामाने उत्तर देत असतो.नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत आम्ही मैत्रिपूर्ण लढत आहोत. तिथे शिंदेसेनेची मोठी ताकद आहे. या ठिकाणी शिंदेसेनेला मोठे यश मिळेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कामाच्या जोरावर महायुतीचाच झेंडा फडकेल. महायुतीचाच महापौर होणार आहे, असा दावाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.उत्तेश्वराची मध्यरात्री पूजा अन् आरती...उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रद्धास्थान असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील उत्तेश्वराच्या चरणी लीन झाले. यासाठी पायी डोंगर चढून यात्रेत सहभागी झाले. मध्यरात्री एक वाजता त्यांच्या हस्ते पूजा, अभिषेक आणि आरती कार्यक्रम पार पडले. यावेळी मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे, सुभाष कारंडे, संजय मोरे, अजित सपकाळ, सचिन कदम, गणेश उतेकर, संपत उतेकर, नीलेश मोरे, रुपेश सपकाळ, विजय शिंदे, मिलिंद शिंदे आदी उपस्थित होते. यादरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींची संख्या अधिक आहे. अनेकांनी योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला; पण, तुमचा भाऊ एकनाथ शिंदे यांच्यामुळे ही योजना बंद झाली नाही आणि कधी बंदही होणार नाही. दुर्गम कोयना, कांदाटी परिसराचा विकास करायचा आहे. उत्तेश्वर मंदिराचे काम लवकरच पूर्ण करू. येथील भक्त निवास आणि इतर कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी एक अधिकारी नेमला जाईल. तापोळ्यातील केबल स्टे ब्रिज मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde slams Thackeray: Mumbai development versus old rhetoric.

Web Summary : Eknath Shinde criticized Uddhav Thackeray, stating the government focuses on Mumbai's development, not just exploiting it. He promised a fast-paced Maharashtra and a super-fast Mumbai, highlighting his commitment to action over words. Shinde also pledged development for remote areas and temple improvements.
टॅग्स :BMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२६Satara areaसातारा परिसरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे