शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘इफ्फी’मध्ये मराठी चित्रपटांची मेजवानी

By admin | Published: November 20, 2014 6:11 PM

तब्बल ११ चित्रपट : ‘एलिझाबेथ एकादशी’ने इंडियन पॅनोरमाचा प्रारंभ

संदीप आडनाईक -पणजी -येथील ४५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ११ मराठी चित्रपटांची मेजवानी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. इंडियन पॅनोरमा विभागात दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांमध्ये फीचर फिल्म विभागात सात, नृत्य विभागात एक आणि नॉन फिचर फिल्म विभागात तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे.दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाद्वारे इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांना प्रारंभ होणार आहे. बहुचर्चित डॉ. प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो हा समृध्दी पोरे यांचा चित्रपटही इफ्फीचे आकर्षण राहणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे यांच्या भूमिका आहेत. ‘अ रेनी डे’ हा आणखी एक चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेईल.‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटाच्या ध्वनीलेखनासाठी आॅस्कर मिळविलेल्या रस्सूल पकुटी यांचे ध्वनीलेखन असलेल्या राजेंद्र तालक यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे. दिग्दर्शक श्रीहरी साठे यांच्या ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटात उषा नाईक आणि संदीप पाठक यांची भूमिका आहे. याशिवाय लोकमान्य : एक युगपुरुष या ओम राऊत दिग्दर्शित चित्रपटात सुबोध भावे, समीर विद्ध्वंस, अंगद म्हसकर, चिन्मय मांडलेकर यांच्या भूमिका आहेत. ‘किल्ला’ या अविनाश अरुण यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपटही उल्लेखनीय असेल. महेश लिमये यांचा ‘यलो’ चित्रपटही आकर्षण असेल.  नृत्य विषयाला वाहिलेल्या भारतीय चित्रपट विभागात व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘पिंजरा’ चित्रपट दाखविण्यात येईल. नॉन फिचर विभागात विजू माने यांचा ‘एक होता काऊ’, रवी जाधव यांचा ‘मित्रा’ आणि प्रसन्ना फोंडे यांचा ‘विठ्या’ हे मराठी चित्रपट दाखविण्यात येतील.