शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावरुन मराठी गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 6:27 PM

त्रैभाषिक वापराला विराम; इंग्रजी, हिंदी भाषेला रेल्वेची पसंती 

अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा वापर होत नसल्याची बाब समोर आली आहे. ‘मध्य रेल्वे डॉट कॉम’ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असले तरी यावर इंग्रजी, हिंदी भाषेचाच वापर होत असल्याचे वास्तव आहे.मध्य रेल्वेची इत्थंभूत माहिती देणारे ‘सीआर डॉट इंडियन रेल्वेज डॉट जीओव्ही डॉट इन’ हे संकेतस्थळ आहे. मात्र, हे संकेतस्थळ सुरू केल्यानंतर इंग्रजी, हिंदी भाषेचाच वापर करावा लागतो, तसे पर्याय देण्यात आले आहे. मध्य रेल्वे विभागाने त्रैभाषिक वापराला पूर्णविराम दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर असा पाच विभागाचा कारभार मध्य रेल्वे विभागात चालत असताना मराठी भाषेचे रेल्वे विभागाला वावडे असल्याचे दिसून येते. संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर इंग्रजी भाषेचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांसाठी मध्य रेल्वे विभागाने संकेतस्थळावर मराठी पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मराठी प्रवाशांकडून होत आहे. राज्यात १२ कोटी लोकसंख्या असून, यात बहुतांश मराठी भाषिक आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने संकेतस्थळावर मराठी भाषेचा वापर सुरू करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा वापर करता यावा, यासाठी प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करण्यात येईल. लवकरच याबाबतचे पत्र मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना पाठवू. मराठी भाषिक प्रवाशांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. - नवनीत रवि राणा, खासदार, अमरावती 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे