अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या होणाऱ्या परेडमध्ये घडणार मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 20:00 IST2019-06-28T19:42:31+5:302019-06-28T20:00:16+5:30
अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होणारी अॅन आर्बर ही पहिली भारतीय संस्था आहे.

अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या होणाऱ्या परेडमध्ये घडणार मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन
पुणे : काही दिवसांपासून भारत व अमेरिका यांचे संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच भारत हा अमेरिकी उत्पादनांवर अधिक आयात शुल्क आकारणारा देश आहे, असे मत व्यक्त केले होते. किमान कर अथवा बरोबरीचा कर असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे. परंतु, दोन्ही राष्ट्रांमधील बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर एक अभिमानाची व आनंदाची बाब म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये प्रथमच भारतीय असोसिएशनला सहभाग नोंदविण्याची संधी प्राप्त होत आहे अॅन आर्बर मराठी मंडळ (ए२एमएस ) अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंगा फडकवतील व मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणार आहे. भारत व अमेरिका यांच्यातील मैत्री दृढ व प्रेरणादायी होण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यात येणार आहे.
अॅन आर्बर मराठी मंडळ ही २००६ मध्ये स्थापना झालेली संस्था अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अर्थातच अॅन आर्बर जेसीज फॉर्थ ऑफ जुलै परेड यात सहभागी होणार आहे.
काही दिवसांपूर्वी भारताच्या आर्थिक धोरणांवर नाराजी व्यक्त करतानाअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते, अमेरिकेत तयार होणारी एक प्रख्यात मोटारसायकल भारतात येते तेव्हा तिच्यावर शंभर टक्क्यांएवढे आयात शुल्क पूर्वी लावले जायचे. त्या
ए२एमएएसचे संस्थापक संचालक भूषण कुलकर्णी म्हणाले, अॅन आर्बर मराठी मंडळ हे अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणजे अॅन आर्बर जेसीज फॉर्थ ऑफ जुलै परेड यात सहभागी होणार आहे. पारंपारिक वेशभूषा परिधान करुन भारतीय नागरिक परेडमध्ये सहभागी होणार आहे. दोन्ही संस्कृतींचा सुरेख संगम पाहण्याची संधी मिळणार आहे.