Ketki Chitale : '...वाट पहातो नरक'; शरद पवारांवरील FB पोस्ट केतकी चितळेला भोवणार; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 09:20 AM2022-05-14T09:20:43+5:302022-05-14T09:23:02+5:30

Ketki Chitale : केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

marathi actress ketaki chitale controversial facebook post ncp leader sharad pawar complaint logged in kalwa police station | Ketki Chitale : '...वाट पहातो नरक'; शरद पवारांवरील FB पोस्ट केतकी चितळेला भोवणार; गुन्हा दाखल

Ketki Chitale : '...वाट पहातो नरक'; शरद पवारांवरील FB पोस्ट केतकी चितळेला भोवणार; गुन्हा दाखल

Next

Ketki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिची फेसबुक पोस्ट वादाचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

केतकी चितळेनं शरद पवार यांच्याबाबत आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये केतकीनं शरद पवार यांच्या आजारावरून टीका केली होती. तिनं आपल्या फेसबुकवर शेअर केलेल्या कवितेच्या खाली तिनं अॅडव्होकेट नितीन भावे असं नावंही दिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसंच काही लोकांनी तिच्या या पोस्टवर संतापही व्यक्त केला आहे. 

यापूर्वीही केतकी चितळे आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आली होती. तसंच तिच्यावर अॅट्रोसिटी दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे केतकी चितळे चर्चेत आली असून तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: marathi actress ketaki chitale controversial facebook post ncp leader sharad pawar complaint logged in kalwa police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app