Maratha Reservation Verdict: 'अब तक ६८'... महाराष्ट्रात कुठल्या समाजाला किती टक्के आरक्षण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 16:31 IST2019-06-27T16:30:06+5:302019-06-27T16:31:23+5:30
मराठा समाजाचं आरक्षण कायम; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Maratha Reservation Verdict: 'अब तक ६८'... महाराष्ट्रात कुठल्या समाजाला किती टक्के आरक्षण?
मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वात चर्चेत राहिला. आरक्षणासाठी मराठा समाजानं अभूतपूर्व मोर्चे काढले. यानंतर भाजपा-शिवसेना सरकारनं गेल्याच वर्षी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील एकूण आरक्षणाचा टक्का 68 वर गेला. मात्र या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. यावर आज न्यायालयानं निकाल दिला. मराठा समाजाला 16 टक्के नव्हे, तर 12 किंवा 13 टक्के आरक्षण देता येईल, असं म्हणत न्यायालयानं आरक्षण कायम ठेवलं. त्यामुळे आता राज्यातील आरक्षणाचा टक्का 64 ते 65 पर्यंत राहण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यात कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण?
मराठा समाज- 16 टक्के (आरक्षण 12-13 टक्के करण्याची न्यायालयाची सूचना)
अनुसूचित जाती- 13 टक्के
अनुसूचित जमाती- 7 टक्के
इतर मागासवर्ग- 19 टक्के
विशेष मागासवर्ग- 2 टक्के
विमुक्ती जाती- 3 टक्के
भटकी जमात (बी)- 2.5 टक्के
भटकी जमात (सी) (धनगर)- 3.5 टक्के
भटकी जमात (डी) (वंजारी)- 2 टक्के