मनोज जरांगे-पाटील यांची बीडमध्ये ९०० एकरांत सभा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 07:51 AM2024-04-06T07:51:01+5:302024-04-06T07:52:15+5:30

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात समाजाची बीड तालुक्यात ८ जूनला सभा होणार आहे.

Maratha Reservation: Manoj Jarange-Patil meeting in 900 acres in Beed? | मनोज जरांगे-पाटील यांची बीडमध्ये ९०० एकरांत सभा?

मनोज जरांगे-पाटील यांची बीडमध्ये ९०० एकरांत सभा?

 बीड - मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात समाजाची बीड तालुक्यात ८ जूनला सभा होणार आहे. श्री क्षेत्र नारायणगडावर ९०० एकरांत सभा घेण्याचा निर्णय झाला असून, शुक्रवारी नारायणगडावरील बैठकीत जरांगे-पाटील यांनी यासंदर्भात घोषणा केली. गावागावांत बैठका घेण्यासाठी २० जणांची टीम तयार करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. या सभेत मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केली.

Web Title: Maratha Reservation: Manoj Jarange-Patil meeting in 900 acres in Beed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.