शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

देवेंद्र फडणवीसांमुळे PM मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार; जरांगे पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 21:23 IST

बीड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी फडणवीसांविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर आक्रमक भाषेत टीका केल्यानंतर सरकारकडून जरांगे यांच्या एसआयटी चौकशीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर मनोज जरांगे हे राज्यातील विविध ठिकाणी जात गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा बीड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांविरोधात हल्लाबोल केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात आज 'मोफत नोकरी महोत्सवा'चे उद्घाटन मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांचं सध्याचं वागणं म्हणजे 'बुडत्याचे पाय डोहाकडे' या म्हणीप्रमाणे सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हेच नरेंद्र मोदी यांचा करेक्ट कार्यक्रम करतील. माझ्यावर फुलं उधळणाऱ्या लोकांवर गुन्हे का दाखल केले जात आहेत? राज्य सरकार माझ्यावर इतकं का जळतं?" असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस तुमच्या जळण्याने काही होणार नाही. हे वर्तन गृहमंत्र्यांना शोभत नाही, असा टोलाही जरांगेंनी लगावला आहे.

९०० एकरवर सभा घेण्याची घोषणा

राज्य सरकारवर निशाणा साधताना मनोज जरांगे म्हणाले की, "राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. मात्र, आम्ही ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. सरकारचं हे आरक्षण फसवं असून आम्हाला मान्य नाही. ज्यांना या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, ते घेतील. मात्र, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. त्यावर, आम्ही ठाम असून लवकरच ९०० एकरामध्ये मोठी सभा होईल. त्यासाठी, राज्यभरातील कोट्यवधी मराठा एकत्र येतील," अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीMaratha Reservationमराठा आरक्षण