शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

Maratha Reservation : ७६.८६ टक्के कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 06:25 IST

सामाजिक दर्जा : आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक

मुंबई : प्रामुख्याने शेतीवर गुजराण करणारा मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष मागासवर्ग आयोगाने काढला असून आयोगाने केलेल्या सर्वेक्षणात ७६.८६ टक्के मराठा कुटुंब शेती आणि शेतमजुरीवर निर्भर असल्याने आढळून आले आहे.मराठा समाज उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असला तरी ७० टक्के मराठा शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. या समाजातील ७१ टक्के कुटुंब भूमिहीन आणि सिमांत भूधारक शेतकरी असून २.७ टक्के शेतकऱ्यांकडे दहा एकरपर्यंत जमीन आहे. २.२१ टक्के कुटुंबाकडे ट्रॅक्टर तर १ टक्का व्यावसायिक वाहनधारक आहेत.

...तरच आत्महत्या कमी होतीलमराठा समाजाच्या कुटुंबातील प्रमुखाच्या व सदस्यांच्या आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक आहे. सर्वेक्षणातील ४०,९६२ कुटुंबातील ३४० सदस्यांनी आत्महत्या केली आहे. सन २०१३-२०१८ या कालावधीत शेती व्यवसायात असलेल्या १३,३६८ व्यक्तींनी आत्महत्या केली त्यात २३.५६ टक्के म्हणजे २१५२ व्यक्ती मराठा होत्या. आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे व शेतीच्या दुरावस्थेमुळे झाल्या आहेत. त्याचे प्रमाण ९९.८६ टक्के आहे. हे प्रमाण इतर जाती समुहांपेक्षा जास्त आहे. मराठा समाजाने शेती शिवाय वैविध्यपूर्ण व्यवसायाकडे वळणे, आधूनिक शेतीची पध्दत अवलंबणे, शैक्षणिक दर्जा सुधारणे आवश्यक आहे जेणेकरुन त्यांच्या मनातील मागासलेपणाची भावना दूर होईल असेही आयोगाने म्हटले आहे.उदरनिर्वाहासाठी केवळ भटके-विमुक्त स्थलांतर करतात असा आजवर समज होता. मात्र मराठा समाजातही स्थलांतराचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आयोगाचे निरीक्षण आहे. नागरी विभागात स्थलांतरीत झालेला मराठा समाज प्रामुख्याने माथाडी हमाल आणि घरगुती कामात अधिक आहे. व्यापार व उद्योगामध्ये या समाजाचे प्रमाण इतर समूहापेक्षा कमी आहे.

पदव्युत्तर शिक्षण घेतलेले केवळ ६.७१ टक्केमुंबई : मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष मागासवर्ग आयोगाने काढला असून या क्षेत्रात आरक्षण देण्याची शिफारस आपल्या अहवालात केली आहे. अशिक्षित १३.४२, प्राथमिक शिक्षण घेतलेले ३५.३१, टक्के, दहावी झालेले ४३.७९, टक्के, बारावी, पदवीपेक्षा कमी आणि पदव्युत्तर ६.७१ आणि तांत्रिक व व्यावसायिकदृष्ट्या सक्षम ०.७७, प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गळतीचे प्रमाण ७.५६, टक्के असून हे प्रमाण इतर मागास वर्गापेक्षा जास्त आहे. मराठा समाजामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक दर्जाच्या शिक्षणामध्ये उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे ७९.५ व ६७ टक्के इतकी आहे. हे प्रमाण व इतर मागासवर्गपेक्षा कमी आहे. या बाबी लक्षात घेता मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध होते असे आयोगाने म्हटले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण