Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेची सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 15:33 IST2018-07-29T15:33:02+5:302018-07-29T15:33:36+5:30
- राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेची सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई - राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. सोमवारी दुपारी 12 वाजता ही बैठक मातोश्रीवर होईल.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेले मराठा समाजाच्या आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या आंदोलनाची गंभीर दखल सरकारला घ्यावी लागली आहे. त्याचाच भाग म्हणून सरकारने शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. तसेच रविवारी दुपारी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काही आंदोलकांसोबत बैठक घेतली होती.