शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र, CM एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना फोन; २४ मिनिटे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 10:41 IST

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळू नये, यासाठी आता मनोज जरांगे यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे.

Maratha Reservation: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत शातंतेत सुरू असलेल्या आंदोलनाला जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमुळे हिंसक वळण लागले. जालना, बीड, धाराशीव, लातूर, नंदूरबार, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले. यासंदर्भात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून,  मराठा आंदोलकांच्या आग्रहामुळे जरांगे आजपासून पाणी पिणार आहे. राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना फोन केला. मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे यांच्यात तब्बल २४ मिनिटे चर्चा झाली, अशी माहिती देण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अर्धवट आरक्षण नको, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही मागणी केली. जरांगे पाटील हे मराठा अभ्यासकांसोबत चर्चा करुन पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात फोनवर तब्बल २४ मिनिटे चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना तब्येत जपण्याचा सल्ला दिला.

मनोज जरांगे यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना समोर येत आहे. यात अनेक राजकीय नेत्यांची घरं आणि कार्यालय पेटवून देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आंदोलन चिघळू नये यासाठी जरांगे यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या सर्व पार्श्वभूमीवर आता पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून विशेष सूचना देण्यात आल्या आहे. यापुढे होणाऱ्या हिसंक आंदोलनात बघ्याची भूमिका घेऊ नका, तोडफोड आणि नुकसान होत असल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती दिल्याचे समजते. तसेच आरक्षणासंदर्भात राज्य सरकार कोणती पावले उचलत आहे, त्याबाबतही त्यांनी माहिती दिल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी मनोज जरांगेंचे उपोषण मागे घेण्यासाठी तसेच मराठा आरक्षणासाठी आणखी काय पावले उचलता येतील यावर चर्चा झाल्याचे समजते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील