शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

बीडच्या जाळपोळीमागे शक्तीशाली व्यक्तीचा हात; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 17:32 IST

मराठा-ओबीसी समाजात वातावरण गढूळ करण्यासाठी तिथे जाळपोळ झाली असं रोहित पवारांनी म्हटलं.

बीड - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले होते. बीडमधील हिंसाचारात आमदारांची घरे, कार्यालये पेटवण्यात आली. आता या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. बीडच्या जाळपोळ, तोडफोडीमागे एका शक्तीशाली व्यक्तीचा हात होता असं रोहित पवारांनी वाशिम येथे संघर्ष यात्रेवेळी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. 

आमदार रोहित पवार म्हणाले की, मी बीडला स्वत:गेलो होतो. या घटनेमागे एका शक्तीशाली व्यक्तीचा हात होता. सत्तेत असणाऱ्या व्यक्तीचा हात होता. हिंसक आंदोलनावेळी जवळपास ७ तास पोलीस शांत बसले होते. सत्तेतला व्यक्ती आदेश देतो तेव्हा पोलीस शांत बसतात. अशावेळी तिथे जाळपोळ करत मराठा-ओबीसी समाजात वातावरण गढूळ करण्यासाठी तिथे जाळपोळ झाली.त्यामुळे बीडमध्ये जे काही घडले. त्यात लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय द्वेषातून हे घडले असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत जानेवारी महिन्यापासून राज्यातील विविध जिल्ह्यात अशाप्रकारे वातावरण गढूळ केले जाऊ शकते. त्यामुळे सर्व ग्रामस्थ, शहरातील लोकांना माझी विनंती आहे की महाराष्ट्र शांत ठेवणे हे सर्वसामान्यांच्या हिताचे आहे.राजकीय द्वेषातून प्रोफेशनल गुंड आणून कुणी जाळपोळ करत असेल हे समजून घेतले पाहिजे असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी राज्यातील जनतेला करत सरकारवर मोठा आरोप केला आहे. 

बीड हिंसाचारात आतापर्यंत २६२ जणांना अटक

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेला १ महिना पूर्ण होत असून यात आतापर्यंत २६२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासात बीडमध्ये जाळपोळ, तोडफोड करणारे एकूण १० गट असल्याचं आढळले. त्यातील ६ गटाचे प्रमुख पकडले गेलेत. इतर ४ गटांचे प्रमुख पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.गटातील इतर सदस्यांना अटक केली आहे. महत्त्वाच्या आरोपींपैकी पप्पू शिंदे यालाही बेड्या ठोकल्या आहेत. त्याची सध्या चौकशी सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

नंदकुमार ठाकूर म्हणाले की, पप्पू शिंदेकडे चौकशी सुरू असून त्यानेदेखील काही नावे सांगितली आहेत. त्याचा तपास सुरू आहे. आम्ही कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. कायदेशीरपणे निष्पक्षपाती या घटनेचा संपूर्ण तपास होत आहे. ही घटना गंभीर असून त्याचे गांभीर्य ओळखूनच पोलीस तपास करत आहे. यात कुठल्याही प्रकारे दबाव घेणार नाही. जे कुणी या घटनेत सहभागी आहेत त्यांना मुभा देणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई होणारच आहे. तपास अंमलदार या घटनेत योग्य तो निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षण