शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

...तर आरक्षणाची गरजच लागणार नाही; राज ठाकरेंनी सांगितला रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 15:35 IST

मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

ठाणे : लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचे उमेदवार नसतानाही अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला झोडपून काढले होते. महाराष्ट्रातला प्रचार थंडावल्याचे वाटत असतानाच राज ठाकरे यांनी पुन्हा राज्य सरकारवर शरसंधान साधले आहे. मराठा आरक्षणावरून सरकारला फसवायचच होतं, असा आरोप त्यांनी केला आहे. 

मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळ, मराठा आरक्षण, नरेंद्र मोदींचे ढगाळ वक्तव्य आणि आंब्याच्या स्टॉलला तोडल्याविरोधात सडकून टीका केली. मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात जाणारच होता. आरक्षण मिळू शकत नव्हतं, यामुळे समाजाला सरकार फसवणारच होतं, एवढी वर्षे महाराष्ट्रातल्या-देशातल्या तरुणांशी खेळ करत बसलात का तुम्ही, असा सवाल विचारत त्यांनी विद्यार्थ्यांना भेटणार असल्याचे राज यांनी सांगितले. 

आरक्षण कोणत्या गोष्टींसाठी हवे आहे. शाळा-कॉलेज प्रवेश आणि नोकरीसाठीच ना, मग खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण नाहीच आहे. ८५ ते ९० टक्के उद्योग खासगी आहेत. मग कुठे नोकऱ्या देणार आहात असा सवाल उपस्थित करताना त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा सगळ्यांनी मान्य केलं होतं, मग अडलं कुठे, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मराठा आरक्षण मिळाल्यावर पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. 

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्थानिकांना प्राधान्य देण्याचा मुद्दा मांडला. या राज्यात जेवढ्या नोकऱ्या निर्माण होताहेत किंवा शिक्षणसंस्था असतील, त्यात जर महाराष्ट्रातील मुलामुलींना प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच लागणार नाही, असे ते म्हणाले. याचबरोबर महाराष्ट्राचं पोटेन्शियल पाहिलं तर महाराष्ट्र उद्योगधंद्यांमध्ये खूप पुढे आहे. अशा परिस्थितीत सिक्युरिटी, रिक्षा, टॅक्सी काहीही असू दे महाराष्ट्रातील मुलांना प्राधान्य असेल तर आरक्षणाची आवश्यकताच लागणार नाही, असे राज यांनी सांगितले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRaj Thackerayराज ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार